शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

‘नो पार्किंग झोन’मध्ये ठेकेदाराकडूनच वसुली

By admin | Updated: October 5, 2015 00:35 IST

अंबानगरीची मॉडेल रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकच नियमांचे उल्लंघन करून वाहने उभी करतात.

रेल्वे पोलिसांचे दुर्लक्ष : नागरिकच करतात नियमांचे उल्लंघनसंदीप मानकर अमरावतीअंबानगरीची मॉडेल रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकच नियमांचे उल्लंघन करून वाहने उभी करतात. परंतु नो-पार्किंग झोनमधील वाहन चालकांकडून ठेकेदारांचे कर्मचारी पठाणी वसुली करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु या बाबीकडे रेल्वे पोलीस कमालीचे दुर्लक्ष करीत असून रेल्वे पोलिसांच्या नाकावर टिच्चून ही अवैध वसुली सुरू असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आला आहे.खान नामक ठेकेदाराला भुसावळ डी.आर.एम. आफिसच्यावतीने तीन वर्षांसाठी रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग व्यवस्थेचा कंत्राट दिल्याचे समजते. हा कंत्राट १४ लाख रुपयांत रेल्वे विभागाने तीन वर्षांकरिता ठेकेदाराला दिल्याची माहिती आहे. नागरिकांनी रेल्वे स्थानक परिसरात वाहन आणल्यानंतर अधिकृत पार्किंग झोनमध्ये वाहने लावणे नियमाने गरजेचे आहे. त्याकरिता ५ ते १५ रुपयांपर्यंत पार्किंग शुल्क स्वीकारण्यात येते. काही नागरिक नियमांचे पालन करतात. पण काही नागरिक थेट रेल्वे स्टेशनच्या नो पार्किंग झोनमध्ये राजरोसपणे आपली वाहने लावतात. पण येथे कार्यरत असलेले जी.आर.पी. आर.पी.एफ.चे पोलीस त्यांना कधीही हटकत नाही. पोलीस कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने एवढ्या मोठ्या रेल्वे स्टेशनवर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात रेल्वे पोलीस अपयशी ठरत आहेत. ठेकेदारांचेही १४ लक्ष रुपयांचे उद्दिष्टे पूर्ण न झाल्यामुळे त्यांना नो पार्किंग झोनमध्ये जाऊन नागरिकांकडून पैसे घेण्यास भाग पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु ही वसुली नियमबाह्य असून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. वसुली करण्यासाठी नेमले कर्मचारीनो पार्किंग झोनमध्ये वाहन चालकांकडून प्रत्येक वाहनांचे ५ ते १० रुपयांपर्यंत पठाणी वसुली करण्यात येते. त्या करिता सदर ठेकेदाराने रोजंदारीने कर्मचारी नेमले आहेत. ते कधी पावत्या देतात, तर कधी देत पण नाहीत. प्रवाशांना व त्यांच्या नातेवाईकांना घाई असते त्यामुळे ते विचारण्याच्या भानगडीत पडत नाहीत.नो पार्किंग झोनमध्ये प्रवाशांनी वाहन लावणे चुकीचे आहे व बाहेरच्या लोकांकडून व ठेकेदारांकडून नो पार्किंग झोनमधील वाहन चालकांकडून पैसे घेणे नियमबाह्य आहे. हा मुद्दा बैठकीत अनेकवेळा मांडण्यात आला आहे. दोेषीविरुध्द कारवाई करण्यात येईल.- बी.पी. गुजर, स्टेशन प्रबंधक, अमरावती.