शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाच्या पपत्र ड ची यादी सादर देण्यास ग्रामसेवकांची ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:12 IST

अमरावती : घरकुल योजनेंतर्गत पपत्र ड मध्ये सुटलेल्या परंतु घरकुलाकरिता पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी सादर करण्याचे आदेश जिल्हा ...

अमरावती : घरकुल योजनेंतर्गत पपत्र ड मध्ये सुटलेल्या परंतु घरकुलाकरिता पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी सादर करण्याचे आदेश जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सीईओंच्या स्वाक्षरीने बीडीओमार्फत ग्रामसेवकांना ५ मे रोजी देण्यात आले. मात्र सदर यादी एक नव्हे तर तीन वेळा संबंधित विभागाला सादर केली आहे. त्यामुळे आता पुन्हा ही यादी सादर करण्यास ग्रामसेवकांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या या पत्राला नेमका काय प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एसईसीसी सर्वेक्षणानुसार जीपीएल लीस्टप्रमाणे घरकुलाच्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी प्रपत्र अ मध्ये तयार करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामसभाव्दारे घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांच्या नावाचा समावेश करून पीडब्युएल प्रपत्र ब कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. प्रपत्र अ मधील घरकुलाकरिता अपात्र लाभार्थ्यांचा समावेश प्रपत्र क मध्ये करून एसईसीसी सर्वेक्षणानुसार लाभार्थी यादी अंतिम करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शासनाने घरकुलाकरिता पात्र असलेल्या परंतु प्रपत्र अ मध्ये समाविष्ट नसलेल्या गरजू लाभार्थ्यांकरिता अर्थातच घरकुलाकरिता पात्र परंतु सुटलेल्या लाभार्थ्याकरिता पपत्र ड तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार ग्रासभेच्या शिफारसीप्रमाणे जिल्ह्यातील १७४१४३ एवढे कुटुंबाचा व ३२८८८९ घरातील सदस्याचा समावेश प्रपत्र ड यादीमध्ये करण्यात आला आहे. परंतु बहुतांश गावांत घरकुलाकरिता पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांचा समावेश प्रपत्र ड मध्ये केलेला नाही, अशा पात्र कुटुंबाची यादी डीआरडीएने दिलेल्या गोषवाऱ्या प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतकडून विस्तुत माहितीसह येत्या १५ दिवसांत ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत मासिक सभेच्या शिफारसीनुसार सादर करण्याचे आदेश सीईओ अविश्यांत पंडा यांनी बीडीओमार्फत ग्रामसेवकांना दिले. त्यानुसार घरकुलाच्या पात्र याद्या प्रपत्र ब मधून सुटलेल्या सर्व लोकांचे रीतसर अर्ज घेऊन ग्रामसभेसमोर ठेवून त्याच्या याद्या आतापर्यंत तीनवेळा प्रशासनाला सादर केल्या आहेत. त्या याद्या ऑनलाईन झालेल्या आहेत. त्यापैकी काही लोकांनी रमाई आवास योजनेतून लाभ सुध्दा मिळाले आहे. परंतु अन्य घटकांतील लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही. तरीही प्रशासन पुन्हा याद्या मागवून ग्रामसेवकांना वेठीस धरत असल्याचा आरोप ग्रामसेवकांमधून होत आहे.

बॉक्स

संघर्ष पेटण्याची चिन्हे

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने २३ एप्रिल च्या झेडपी स्थायी समिती सभेतील अध्यक्षांच्या निर्देशाचा हवाला देत ग्रावसेवकांना प्रपत्र ड मध्ये सुटलेल्या परंतु घरकुला करीता पात्र लाभार्थ्याची यादी मागविली आहे. याकरिता सीईओंच्या स्वाक्षरीने १५ दिवसांचा अवधी दिला आहे. मात्र ग्रामसेवकांनी ही यादी वारंवार सादर करण्यास नकार दर्शविल्याने या विषयावर प्रशासन व ग्रामसेवक संवर्गात संघर्ष पेटण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.