शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

-तर नव्या नोटा स्वीकारण्यासही नकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 00:24 IST

पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर पाचशे व दोन हजारांच्या नव्या नोटा

आरबीआयची अधिसूचना : नोटांवर लिहिणे पडणार महागात अमरावती : पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर पाचशे व दोन हजारांच्या नव्या नोटा नागरिकांना वितरीत करण्यात आल्यात. मात्र, या नवीन नोटांवर काही लिहिलेले किंवा स्टॅपल केले असल्यास त्या नोटाच बँकांकडून स्वीकारल्या जाणार नाहीत. अशी अधिसूचनाच भारतीय रिजर्व बँक आॅफ इंडियातर्फे काढण्यात आली आहे. त्यामुळे आता नवीन नोटांवर काही लिहून ठेवणे नागरिकांना महागात पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला जुन्या पाचशे व एक हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर देशभरातील नागरिकांची ताराबंळ उडाली. या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सुरूवातीच्या दिवसांत जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी स्पर्धाच लागली होती. प्रत्येकांनी जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी केली. यानोटाबंदीचा अनेकांना त्रास सहन करावा लागला. बँकातून पैसे काढण्यासाठीही नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. आता ती स्थिती बदलली असून बँका व एटीएमसमोरील गर्दी सुद्धा कमी झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे आर्थिक व्यवहार बऱ्यापैकी सुरळीत झाले आहेत. आता नव्या नोटांवर आर्थिक व्यवहार सुरू झाले असून गोळा झालेल्या नवीन नोटा बँकांमध्ये जमा करण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, नव्या नोटांवर पेन अथवा स्केच पेनद्वारे काही लिहिले असल्यास त्या नोटा बँकांकडून स्वीकारण्यात येणार नसल्याची अधिसूचना आरबीआयने काढली आहे. त्यामुळे नव्या नोटांवर काही लिहिण्याचे प्रयत्न नागरिकांनी करू नयेत, असे संबंधित बँकांकडून खातेदारांना सांगण्यात येत आहे. देवरणकरनगरातील बँक आॅफ इंडियामध्ये सुरक्षारक्षकच रांगेतील नागरिकांना नोटांवर काही लिहू नका, अन्यथा स्वीकारल्या जाणार नाहीत, अशा सूचना देत आहे. त्यामुळे नवीन नोटा बाळगताना नागरिक कमालीचे जागरूक असल्याचे दिसत आहेत. हा एक चांगला संकेत आहे. २ हजार कोटींच्या जुन्या नोटा गोळा जिल्ह्यातील ३३१ बँकांमध्ये गोळा झालेल्या पाचशे व हजारांच्या जुन्या नोटा आता दोन हजार कोटींपर्यंत पोहोचल्या आहेत. आता जुन्या नोटा बँकामध्ये जमा करण्याचे प्रमाण कमी झाले असून अजुनही जुन्या नोटा बँकांमध्ये जमा केल्या जात आहेत. डेडलाईन जसजसी जवळ येत आहे, तशी नोटा जमा करण्याची लगबग वाढली आहे.