शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची भिंत कोसळून नऊ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 05:00 IST

तालुक्यातील उदखेड येथील जिल्हा परिषद शाळेची कुंपणभिंत त्यालगत राहणाऱ्या कुरवाडे यांच्या घरावर पडली. त्यामुळे झोपेतच असलेले नऊ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे ६ च्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्यात दबलेल्या लोकांना बाहेर काढल्याने अनुचित घटना टळली.

ठळक मुद्देकुरवाडे कुटुंब झोपेत असतानाच घडला अपघात, अंगावर पडले टीनपत्रे

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी :  तालुक्यातील उदखेड येथील जिल्हा परिषद शाळेची कुंपणभिंत त्यालगत राहणाऱ्या कुरवाडे यांच्या घरावर पडली. त्यामुळे झोपेतच असलेले नऊ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे ६ च्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्यात दबलेल्या लोकांना बाहेर काढल्याने अनुचित घटना टळली.कुरवाडे कुटुंब झोपेत असतानाच शिकस्त झालेली भिंत घरावर कोसळली. नर्मदा लक्ष्मणराव कुरवाडे (६५), मुले गजानन (३४) व मंगेश (३१), सुना अंबिका (३०) व सूर्यकांता (२६), व नातू साक्षी (१४), श्रेया (१२), सोनाली (९) व आर्यन (६) हे ढिगाऱ्याखाली दबून किरकोळ जखमी झाले. त्यापैकी मंगेश हा टिनाखाली दबल्याने जखमी झाला. मोहन अढाऊ, किशोर पाटील, मनोहर कुरवाडे यांनी जखमींना मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी औषधोपचार केला. मात्र, नऊही रुग्णांना किरकोळ मार लागल्याचे स्पष्ट करण्यात आले. घटनेची माहिती मोहन अढाऊ यांनी आ. देवेंद्र भुयार यांना दिली. मोर्शीचे प्रभारी तहसीलदार विठ्ठल वंजारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. 

ठरावाची अंमलबजावणी नाहीसरपंच धनराज राठोड यांच्या नेतृत्वात १५ मार्च रोजी ग्रामपंचायत सभागृहात शाळेची भिंत डिसमँटल झाल्याचा ठराव घेतला. तो पंचायत समितीकडे पाठविण्यात आला. भिंतीचे नव्याने बांधकाम करण्याविषयी कागदोपत्री कार्यवाही सुरू असताना अचानक भिंत कोसळली.

जिल्हा परिषदेच्या ४०० शाळांच्या परिपूर्ण बांधकाम प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. निधीदेखील मंजूर झाला आहे. बांधकाम संबंधित विभागाकडून कार्यवाही अपेक्षित आहे. किती शाळा झाल्या, हे सांगू शकत नाही. - ई.झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

पाऊस ठरले कारणमोर्शी तालुक्‍यात तीन दिवसांपूर्वी पावसाचे आगमन झाले. जिल्हा परिषद शाळेची कुंपणभिंत जर्जर झाली होती. ती केव्हाही कोसळेल, असा अंदाज बरेच दिवसांपासून व्यक्त केला जात होता. याबाबत कुरवाडे कुटुंबाने ग्रामपंचायतीला कळविलेदेखील होते. अखेर उदखेड शिवारात दोन दिवसांपासून कोसळत असलेला पाऊस भिंत कोसळण्यास कारणीभूत ठरला.

 

टॅग्स :SchoolशाळाRainपाऊस