शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

वणवा नियंत्रणासाठी नवे ‘सॅटेलाईट’

By admin | Updated: February 25, 2017 00:01 IST

उन्हाळ्यात जंगलात लागणाऱ्या आगीमुळे वनसंपदा नष्ट होते. वन्यजीव, सरपटणारे प्राणी होरपळून नामशेष होतात.

वनाधिकाऱ्यांना क्षणात माहिती : ‘मॉडिफ’ नावाचे सॉफ्टवेअर कार्यान्वितअमरावती : उन्हाळ्यात जंगलात लागणाऱ्या आगीमुळे वनसंपदा नष्ट होते. वन्यजीव, सरपटणारे प्राणी होरपळून नामशेष होतात. तर लाखो हेक्टर जंगलाला क्षती पोहोचते. मात्र, आता जंगलातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अद्ययावत नव्या सॉफ्टवेअरचा वापर होत असून आगीची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना क्षणात मिळत आहे.उन्हाळा प्रारंभ झाला की जंगलात वनवणव्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. जंगलात आग लागल्यास ती परंपरागत पद्धतीने विझविली जाते. मात्र, उन्हाळ्यात जंगलात लागणारी आग ही त्वरेने पसरते. त्यामुळे काही तासांतच जंगल आगीने वेढले जाते. परंतु केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने देशभरातील जंगलात लागणाऱ्या आगीवर नियंत्रण आणि उपाययोजना करण्यासाठी नवे सॅटेलाईट विकसित केले आहे. हे सॅटेलाईट डेहरादून येथून नियंत्रित केले जात असून जंगलात आग लागल्यास ती क्षणात संबंधित अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर येते. नेमकी ही आग कोणत्या वनखंडात लागली. गाव, परिसराचा नकाशा, क्षेत्रपरिसर आदी माहिती मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षकांना मिळते. त्यामुळे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना जंगलात लागलेल्या आगीची माहिती वनकर्मचाऱ्यांकडून मिळेल, हीपरंपरागत पद्धत कालबाह्य झाली आहे. जंगलातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार सॅटेलाईटद्वारे जंगलातील आग आटोक्यात आणता येणार आहे. सॅटेलाईटद्वारे जंगलातील आगीची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांंना मिळावी, यासाठी त्यांची केनेक्टिव्हीटी मोबाईलने जोडण्यात आली आहे. यापूर्वी जंगलात आग लागल्यानंतर वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना त्याआगीची माहिती उशिराने मिळायची. आगीबाबत अधिकाऱ्यांना वनकर्मचाऱ्यांवर अवलंबून रहावे लागत होते. परंतु आता जंगलात आग लागल्यास हीमाहिती सर्वात प्रथम वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहित होते. त्यानंतर या आगीची माहिती वनपाल, वनरक्षकांपर्यत पोहोचते. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, प्रादेशिक वनविभागाने आगीवर नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. जंगलात आग लागू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.भानखेडा, वडाळीत आगीची माहिती मिळाली सॅटेलाईटवर दोन दिवसांपूर्वी भानखेडा व वडाळी जंगलात अचानक किरकोळ आग लागल्याची माहिती सॅटेलाईटद्वारे उपवनसंरक्षकांना मोबाईलवर मिळाली. नेमकी कोणत्या वनखंडात लागली आग,गाव, क्षेत्र, गावाचा नकाशा, वनबीट आदी माहिती सॅटेलाईटने मिळणे सुकर झाले आहे.‘नासा’ने जंगलातील आगीवर नियंत्रणासाठी मॉडेल विकसित केले आहे. आगीबाबत माहितीची २४ तास सेवा आहे. ‘मोडिफ’ नावाचे नवे सॉफ्टवेअर वापरले जात आहे. यावेळी दोन सॉफ्टवेअरचा वापर करुन सॅटेलाईटने जंगलातील आगीची माहिती मिळविली जात आहे.- हेमंत मीणा, उपवनसंरक्षक, अमरावती.