शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
3
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
4
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
6
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
7
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
8
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
9
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
10
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
11
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
12
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
13
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
14
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
15
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
16
मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
17
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
18
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
19
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
20
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव पेठचा टोल नाका वरुड-मोर्शीकरांसाठी डोकेदुखी

By admin | Updated: December 20, 2014 00:21 IST

राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही टोल फ्री पासेस दिल्या आहेत. चौपदरी राष्ट्रीय महामार्ग हा अमरावती ते नागपूरकडे जातो.


अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव (पेठ) येथील टोलनाक्याच्या बेंबदशाहीमुळे वरुड मोर्शी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. सदर टोल टॅक्स हा किलोमीटरप्रमाणे घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे. राजकारण्यांच्या कार्यकर्त्याना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनीधींना सुध्दा टोल फ्री पासेस मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष उफाळून येत आहे.
राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही टोल फ्री पासेस दिल्या आहेत. चौपदरी राष्ट्रीय महामार्ग हा अमरावती ते नागपूरकडे जातो. परंतु वरुड, मोर्शी तालुक्यातील नागरिकांना सुध्दा विनाकारण भुर्दंड सोसावा लागतो. यामुळे खासगी वाहनधारकांनीसुध्दा आपले भाडे वाढवून ग्राहकांवरच बोझा लादला आहे. एसटीलासुध्दा टोल भरावा लागत असल्याने याचा भुर्दंड प्रवाशांवर पडतो. परंतु याकडे राजकारण्यांचे लक्ष नाही. एकीकडे वाहनचालकांना परिवहन विभागाचा वाहन कर, रस्ता कर (रोड टॅक्स) भरावा लागतो. यामध्ये सहा चाकी ट्रकला १३ हजार ३६४ रुपये वार्षिक, दहा चाकी टॅ्रक मालकाकडून २१ हजार ७८० रुपये वार्षिक, १२ चाकी ट्रकला २९ हजार १२० रुपये वार्षिक, असा अवाढव्य वार्षिक रोड टॅक्स परिवहन विभाग वसूल करतात. रस्त्यावरुन चालण्याचासुध्दा टॅक्स यात समाविष्ट असतो. तरीसुध्दा बीओटी तत्त्वावर रस्त्याची निर्मिती करुन ठेकेदारांना टोलटॅक्स वसुलीचा भुर्दंड देऊन वाहनचालकासह नागरिकांची आर्थिक लूट करण्याचे षड्यंत्र शासनाने चालविले आहे. टोलटॅक्स घेत असल्याने परिवहन विभागाचा रोडटॅक्स कशासाठी? असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. अमरावती ते टोलनाका नांदगाव (पेठ ) हे केवळ ९ कि.मी.चे अंतर असताना वरुड मोर्शी तालुक्यातील नागरिकांना चारचाकी वाहनांकरिता जाणे-येणे १२० रुपये तर जाणे ८० रुपये, हलके भाडोत्री वाहने १८५ रुपये जाणे येणे तर जाण्यासाठी १२५ रुपये, दोन अ‍ॅक्सेल ट्रक, बसकरिता ३८० रुपये जाणे-येणे तर जाण्यासाठी २५५ रुपये, जड वाहने दोनपेक्षा अधिक अ‍ॅक्सेल, जेसीबीसह अन्य जड वाहनांसाठी जाणे-येणे ५८५ रुपये तर जाणे ३९० रुपये, सात किंवा त्यापेक्षा अधिक अ‍ॅक्सेलच्या जडवाहनांकरिता जाणे-येणे ७३५ रुपये आणि जाणे ४९० रुपये असा टोल द्यावा लागतो. तर ट्रककरिता वाहनांच्या क्षमतेनुसार टॅक्स आकारण्यात आला आहे. यामध्ये प्रशासनाची वाहने, रुग्णवाहिका, अग्निीशमन, मंत्री, राज्यपालासह आदी अधिकाऱ्यांच्या वाहनांना टोल नाही. टोल नाका ते नांदगाव (पेठ) पासून वळण घेऊन पुढे मोर्शी, वरुडकडे येणाऱ्यांना हा विनाकारणचा भुर्दंड सहन करावा लागतो. परंतु टोल टॅक्स घेत असल्याने नांग्दगाव ते वरुडपर्यंत असलेल्या राज्य महामार्गाचीसुध्दा तेवढ्याच गंभीरतेने सुधारणा करावी, म्हणजे टोल टॅक्स देताना वानहनचालकांची लूट होणार नाही. नांदगाव ते वरुड मार्गाची दुर्दशा झाली आहे.