शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वरूडमधील चौकांना गावांचीच नावे!

By admin | Updated: May 9, 2014 01:01 IST

हजारो वर्षांचा इतिहास लाभलेले ऐतिहासिक वरुड गाव आहे. पूर्वी वरदा खेटक म्हणजे आजचे वरुड. येथे प्राचीन मंदिरे आहेत. वरूडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील चौकांना गावांची नावे देण्यात आली आहेत.

वरुड : हजारो वर्षांचा इतिहास लाभलेले ऐतिहासिक वरुड गाव आहे. पूर्वी वरदा खेटक म्हणजे आजचे वरुड. येथे प्राचीन मंदिरे आहेत. वरूडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील चौकांना गावांची नावे देण्यात आली आहेत.
ब्रिटिशकाळात देशाच्या स्वातंत्र्य युद्धात हिरीरीने भाग घेणार्‍या स्वातंत्र्यवीरांची वरूड ही भूमी आहे. दीडशे वर्षांची साक्ष देणारी मराठी शाळा तर शेकडो वर्षांचे पोलीस ठाणे आहे. ब्रिटिशकालीन नगरपरिषद असून सर्वक्षेत्रात नावलौकिक मिळविणारे प्रतिभावंत येथे आहेत. यामुळे श्रमशक्ती, ज्ञानशक्ती, युवाशक्ती वास करीत असतानाच धनशक्तीसुद्धा मोठय़ा प्रमाणात वास करायला लागली. यामुळे धनाढय़ लोकांचे गाव म्हणून ख्याती आहे. येथील लोकसंख्या ६0 हजारांपेक्षा अधिक असून पूर्वीहा तालुका मध्यप्रांतात होता. परंतु येथील काही चौकांना आजही गावांच्या तर काही ठिकाणी प्रतिष्ठानांच्या नावानी ओळखले जाते.
या गावाला मध्यप्रदेशची सीमा लाभली आहे. तर नागपूर, वर्धा जिल्ह्याची सीमा असल्याने वरुड शहर एक व्यापारी बाजारपेठ म्हणून उदयास आले आहे. या गावाला चारही दिशेने रस्ते जुळले आहे.
राज्य महामार्ग क्र २४४, १0 येथून जातो. गावात अनेक चौक आहेत. मध्यप्रदेशातील छिंदवाडा, बैतुल, मुलताई, पांढुर्णा, नागपूर, वर्धा, अमरावतीकडे मार्गजातात. केंद्रस्थानी वरुड शहर आहे. शहरात मुख्य वर्दळीचा महात्मा गांधी चौक आहे. तो केदार चौक म्हणून परिचित आहे. मुलताईकडे जाणारा राज्य महामार्ग असून या चौकाला मुलताई चौक म्हणून तर पांढुर्णाकडे जाणारा मार्ग असल्याने येथील 'टी' पाईंटला पांढुर्णा चौक म्हणून ओळख आहे.
वर्धेकडे जाणार्‍या राजुराबाजार मार्गावर पूर्वीचा जकात नाका असल्याने राजुरा नाका म्हणून ओळख आहे. या चौकांचा शासकीय कागदोपत्रीसुध्दा याच नावाने उल्लेख केला जातो. येथे संत-महंतांसह समाजसेवक, स्वातंत्र्यसेनानी झाले. परंतु या चौकाला कुण्याही स्वातंत्र्यवीरांचे नाव देण्यात आले नाही. अनेकवेळा नामकरणाकरिता आंदोलनेही झालीत. परंतु चौकांचे नामकरण झाले नाही. तरीही नागरिकांच्या तोंडून त्या गावांच्या नावाचा उद्धार होतो. टपालीचे पत्तेसुध्दा याच नावाने टाकले जातात. यामुळे चौकांना गावाची नांो असलेले वरुड असे एकमेव शहर आहे.