शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

राजापेठ बसस्थानकाला छत्रपती शिवाजींचे नाव

By admin | Updated: March 27, 2016 00:02 IST

कित्येक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या राजापेठ येथील नवनिर्मित बसस्थानकाला शनिवारी नांव मिळाले.

विद्यार्थी स्वाभिमानकडून नामकरण : आ. रवि राणांचा पुढाकारअमरावती : कित्येक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या राजापेठ येथील नवनिर्मित बसस्थानकाला शनिवारी नांव मिळाले. आ. रवि राणाप्रणित विद्यार्थी स्वाभिमानी संघटनेने राजापेठ बसस्थानकाचे नामकरण छत्रपती शिवाजी बसस्थानक राजापेठ, असे केले आहे. या भागात तशा कमानी आणि प्रवेशव्दार लावण्यात आले. बडनेराचे आमदार रवि राणा यांच्या उपस्थिस्तीत शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा नामकरण सोहळा पार पडला. शिवजयंतीचे औचित्य साधून विद्यार्थी स्वाभिमान संघटनेने राजापेठ बसस्थानकाला रयतेच्या राजाचे नाव दिले. स्थानिक गद्रे चौकात बंजरंग टेकडीच्या बाजूच्या परिसरात मध्यवर्ती बसस्थानक साकारण्यात आले आहे. बसस्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतरही या बसस्थानकाला कुठलेही नांव देण्यात आले नाही. किंवा उद्घाटन होऊन येथून एसटीची ये-जा होऊ शकली नाही. राजापेठ - गद्रे चौकातील या बसस्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव द्यावे, अशी मागणी विद्यार्थी, युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत केली होती. युवा स्वाभिमानचे जितू दुधाने आणि अनूप अग्रवाल यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे शनिवारी शिवजयंती पर्वावर स्वाभिमान परिवाराने पुढाकार घेत आमदार रवि राणा यांच्या उपस्थितीत राजापेठ बसस्थानकाचे छत्रपती शिवाजी बसस्थानक, असे नामकरण केले. यावेळी राणा यांच्या समवेत जितू दुधाने, बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे, विकास इंगोले, विनोद गुहे, संजय हिगांसपुरे, ज्योती सैरिसे, सुमती ढोक यांची उपस्थिती होती. रयतेच्या राजाचे नांव देण्यासाठी परवानगी हवी कशाला, असा प्रश्न करीत राणांनी या नामकरण सोहळ्याला पाठिंबा दिला आहे. (प्रतिनिधी)