शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराच्या कृत्याने नाव कलंकित

By admin | Updated: June 29, 2015 00:38 IST

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा हा राष्ट्रवादीचे विद्यमान आ. रमेश कदम यांनी केला आहे.

साठे महामंडळातील घोटाळा : लक्ष्मणराव ढोबळे यांचा पत्रपरिषदेत आरोपअमरावती : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा हा राष्ट्रवादीचे विद्यमान आ. रमेश कदम यांनी केला आहे. परंतु या महामंडळात घोटाळा झाल्याप्रकरणी अनेक योजना, प्रकल्पांना निधी देण्याचे शासनाने थांबविले आहे. घोटाळ्यामुळे अण्णाभाऊंचे नाव कलंकित झाले आहे. ही बाब संपूर्ण समाजासाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे आमदाराच्या पापाचे खापर समाजावर न फोडता १ आॅगस्टपासून योजनांना निधी उपलब्ध करुन दिला नाही तर राज्यभर आंदोलन केले जाईल, असा गर्भीत इशारा राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी रविवारी येथे दिला.ढोबळे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी येथील शासकीय विश्रामभवनात पत्रपरिषद घेऊन अण्णाभाऊ साठे महामंडळात झालेल्या घोटाळ्याची मालिकाच वाचली. साठे महामंडळाचे ३० वर्षे उत्तम कामकाज सुरु असताना सन- २०१४ या एकाच वर्षात आ. रमेश कदम यांनी ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्यानंतरही अटक केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले. आ. कदम हे आघाडी शासनाच्या काळात या महामंडळाचे अध्यक्ष होते. कदम अध्यक्ष असलेल्या तीन संस्थांना त्यांनी महामंडळाच्या तिजोरीतून १४२ कोटी रुपयांचे नियमबाह्य वाटप केले, असा आरोप ढोबळे यांनी केला. महामंडळातील घोटाळ्याची चौकशी सीआयडीमार्फत सुरु असली तरी या चौकशीला फारसा वेग आलेला नाही. आ. कदम यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचे चौकशीत समोर आले असताना घोटाळेबाज अद्यापही मोकळेच आहेत. सीआयडीने अमरावती, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र व औरंगाबाद विभागात चौकशीसाठी चार चमुंची नियुक्ती केली आहे. ही चौकशी होऊन दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. परंतु ज्या समाजाला या महामंडळाकडून उत्थानाच्या अपेक्षा आहेत त्या अण्णाभाऊ साठे महामंडळात पूर्ववतपणे योजना, प्रशिक्षण, शिष्यवृत्ती, रोजगाराचे दालन, कर्जवाटप, मातंग महिला समृद्धी योजना सुरु करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी १ आॅगस्टपासून महामंडळात योजना सुरु करण्यात आल्या नाही तर समाज रस्त्यावर उतरेल, असे लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतलेले ढोबळे हे भाजपच्या वाटेवर असल्याचा प्रश्न विचारताच जो पक्ष समाजाच्या हिताचे काम करेल त्याची साथ घेऊ. कोणताही राजकीय पक्ष वर्ज्य नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.पत्रपरिषदेला उत्तमराव भैसने, बबनराव शिर्के, गणेशदास गायकवाड, सुरेश स्वर्गे, एस. एम.गवई, अजय डोंगरे, दिलीप जोगदंड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)