शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत पोलीस ठाणे निर्मितीचा प्रस्ताव रखडला

By admin | Updated: June 22, 2014 23:47 IST

महापालिकेत स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मितीचा प्रस्ताव मंजूर करुन तो पुढील निर्णयासाठी शासनाकडे पाठविण्यात आला; मात्र दीड वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही नगरविकास विभागाने या प्रस्तावाला

अमरावती : महापालिकेत स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मितीचा प्रस्ताव मंजूर करुन तो पुढील निर्णयासाठी शासनाकडे पाठविण्यात आला; मात्र दीड वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही नगरविकास विभागाने या प्रस्तावाला अद्यापही मान्यता दिली नाही. तर दुसरीकडे संरक्षणासाठी पोलीस बळ मिळत नसल्याने शहरात अतिक्रमण वाढीस लागून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.शासन निर्णयानुसार प्रत्येक महापालिकेत स्वतंत्र पोलीस ठाणे निमिर्तीचा प्रस्ताव होता. त्यानुसार अमरावती महापालिकेने स्वतंत्र पोलीस ठाणे निमिर्तीचा प्रस्ताव आमसभेत मंजूर करुन तो शासन निर्णयासाठी पाठविला. हा प्रस्ताव पाठवून दीड वर्षांचा कालावधी झाला असताना पोलीस ठाणे निमिर्तीचे भिजत घोंगडे कायम असल्याचे चित्र आहे. महापालिकेत स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण होणार असल्याने संरक्षणाचा प्रश्न सुटेल, या आशेने लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र पोलीस ठाणे निमिर्तीचा विषय मार्गी लागत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे. हल्ली संरक्षणासाठी पोलीस बळ मिळत नसल्यामुळे वाढते अतिक्रमण कसे थांबवावे, असा सवाल महापालिकेसमोर निर्माण झाला आहे. फुटपाथवरील अतिक्रमणाची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने अनेकदा पोलीस बळाची मागणी केली. परंतु कोणतेही कारण पुढे करून महापालिकेला पोलीस देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. नागरी भागात अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलनाचा प्रश्न पोलीस संरक्षणाअभावी कसा सोडवावा, या विंवचनेत महापालिकेचा अतिक्रमण विभाग आहे. काही भागात धार्मिक स्थळी अतिक्रमण झाल्याने ते पोलीस संरक्षणाशिवाय काढणे अशक्य आहे. मागील सहा महिन्यांपासून संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त मागितला जात असताना अद्यापही दिला नाही. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनंतरही वादग्रस्त अतिक्रमण हटविता येत नाही, हे शल्य आयुक्त अरुण डोंगरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.