शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

१४ जूनपर्यंत मान्सूनचे विदर्भात आगमन

By admin | Updated: May 15, 2016 00:05 IST

यंदा १४ जूनपर्यंत विदर्भात मान्सून पोहोचण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे.

हवामान तज्ज्ञांचा अंदाज : शनिवारपर्यंत पावसाची शक्यतावैभव बाबरेकर  अमरावती यंदा १४ जूनपर्यंत विदर्भात मान्सून पोहोचण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे. दुष्काळग्रस्त स्थितीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही सुखद बातमी आहे. त्यातच शनिवारपर्यंत पुन्हा विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या अंदानानुसार, यंदा २८ किंवा ३० मे रोजी मान्सून केरळात दाखल होणार असून १० ते १२ जूनदरम्यान महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यंदा उन्हाळा चांगला तापणार असल्याचे भाकित हवामान तज्ज्ञाने दिले होते. त्यानुसार तापमानाने उच्चांकाकडे वाटचाल करून ४५ डिग्री सेल्सिअसचा आकडा गाठला आहे. मात्र, दरम्यान अवकाळी पावसाने तापमान पुन्हा खाली उतरले. आता आणखी तापमान हळुहळू वाढू लागले आहे. अनिल बंड यांच्या मते नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वारे ठळक कमी दाबाचे श्रेत्रात रुपांतरित होण्याची शक्यता आहे. परिणामी पूर्व मान्सून सिझनचे पहिले चक्रीवादळ चेन्नई किनारा व आंध्र प्रदेश ओरिसामध्ये येत्या २ ते चार दिवसात मुसळधार वादळी पावसाची शक्यता आहे. हे वादळ मान्सूनला बळ देणार असून मान्सून वेळेपूर्वी येण्याची शक्यता आहे. विदर्भ ते तामिळनाडू खंडीत वारे असल्यामुळे शनिवारपर्यंत विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. दरम्यान, ३९ ते ४१ डिग्रीपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे. त्यातच गुरुवारी पुन्हा पावसाची शक्यता आहे. साधारणत: मे व जूनचा पहिल्या आठवड्यात सर्वाधिक तापमानाच्या नोंदी झाल्या आहेत. त्यामुळे आता उन्हाळ्यातील शेवटच्या दिवसात सूर्य आग ओकणार अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसात वापसाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या असह्य उकाड्याने आता नागरिक हैराण होत आहे. शनिवारपर्यंत पावसाची शक्यता असून त्यानंतर तापमान हळूहळू वाढणार आहे. २ ते ३ डिग्रीने तापमान वाढून ४४ डिग्री पार करणार आहे. तसेच यंदा १४ जूनपर्यंत मान्सून विदर्भात धडकणार असल्याची शक्यता आहे. - अनिल बंड, हवामान तज्ज्ञ