शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगातील शौचालयाचे अनुदान वितरण बंद

By admin | Updated: November 11, 2014 22:32 IST

केंद्र आणि राज्यस्तरावर राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामासाठी आता १२ हजार रूपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे.

अमरावती : केंद्र आणि राज्यस्तरावर राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामासाठी आता १२ हजार रूपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे. स्वच्छ भारत मिशनच्या २ आॅक्टोबर २०१४ पासून योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र आणि राज्यस्तरावर राबविण्यात येत असलेल्ळा निर्मल भारत अभियानचे २ आॅक्टोबर रोजी स्वच्छ भारत मिशन असे नामकरण करण्यात आले. निर्मल भारत अभियानातून वैयक्तिक शौचालयाने बांधकाम करण्यासाठी ४६०० रूपयांचे अनुदान देण्यात येत होते. तसेच या लाभार्थ्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) ४५०० असे एकूण ९१०० रूपयांचे अनुदान मिळत होते. त्याऐवजी आता स्वच्छ भारत मिशन म्हणून १२ हजार रूपये देण्यात येणार आहेत. यातील ९ हजार रूपये (७५ टक्के) केंद्र शासन तर ३ हजार रूपये (२५ टक्के) राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे तर मनरेगातून दिले जाणारे प्रोत्साहन अनुदान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांमधील शौचालयांच्या बांधकामासाठी स्वतंत्रपणे अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येणार आहे. तोपर्यंत स्वच्छ भारत मिशनमधून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सार्वजनिक शौचालयाच्या उभारणीसाठी दोन लाख रूपये देण्यात येणार असून त्यातील १ लाख २० हजार रूपये केंद्र शासन ६० टक्के ६० हजार रूपये, राज्य शासन ३० टक्के देणार असून २० हजर रूपये १० टक्के लोकवर्गणीतून जमा करावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)