शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
4
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
5
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
6
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
7
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
8
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
9
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
10
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
11
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
12
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
13
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
14
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
15
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
16
नीट हिंदी येत नाही अन् सीतेची भूमिका करणार? साई पल्लवी ट्रोल, 'रामायण'च्या मेकर्सचा मोठा निर्णय
17
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
18
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
19
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
20
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
Daily Top 2Weekly Top 5

टपाली मतांची होणार प्रथम मोजणी काऊंटडाऊन सुरु

By admin | Updated: May 15, 2014 00:48 IST

मतमोजणीची प्रतीक्षा संपण्याची घटका जवळ आली आहे. त्यामुळे नागरिकांची उत्सुकता शिगेवर आहे. गुरुवार १५ मे रोजी सायंकाळपर्यंत निवडणूक

आयोगाच्या नवीन सूचनांची अंमलबजावणी

गजानन मोहोड  अमरावती

मतमोजणीची प्रतीक्षा संपण्याची घटका जवळ आली आहे. त्यामुळे नागरिकांची उत्सुकता शिगेवर आहे. गुरुवार १५ मे रोजी सायंकाळपर्यंत निवडणूक विभागाकडे प्राप्त झालेल्या पोस्टल बॅलेटची प्रथम मोजणी होईल. त्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात समाविष्ट ६ विधानसभा संघनिहाय मतमोजणी केली जाईल, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली. अमरावती लोकसभेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. शुक्रवारी सकाळी ८ वाजता पोस्टल मतांची मोजणी होईल. यासाठी प्रत्येक उमेदवाराच्या एका प्रतिनिधीला आत प्रवेश दिला जाईल. त्यानंतर मतदान यंत्रांची मोजणी सुरु होईल. त्यानंतर सर्व विधानसभा मतदार संघातील मतमोजणी एकाच वेळी सुरु करण्यात येणार आहे. अशी होणार मतमोजणी सकाळी ६.३० मिनिटांनी ईव्हीएम मशीनच्या स्ट्राँग रुम उघडणार. विधानसभा मतदार संघनिहाय असणार टेबल प्रत्येक टेबलवर एका उमेदवाराच्या एका प्रतिनिधीला प्रवेश निवडणूक निरीक्षक प्रत्येक राऊंडच्या दोन मशीन्सची तपासणी करणार. मतमोजणीत चूक आढळल्यास मोजणी करणार्‍या कर्मचार्‍यावर कारवाई चूक करणार्‍या कर्मचार्‍याद्वारे मोजण्यात आलेल्या त्या राऊंडच्या सर्व मशीन्सची फेरमोजणी करण्याच्या सूचना आहेत मतमोजणी अधिकार्‍यांनी हस्तलिखीत व संगणकीय बेरीज करायची आहे.

बेरजा तपासणीसाठी बँकाचे अधिकारी मायक्रो निरीक्षक म्हणून भूूमिका बजावतील. शहरात तगडा बंदोबस्त मतमोजणी केंद्रासह शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. शहरात २६ ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावणार असून मतमोजणी केंद्राच्या आत ४ वरिष्ठ निरीक्षक, ३ निरीक्षक, केंद्राच्या आत ८ व बाहेर ५ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक तैनात असतील. याशिवाय अतिशीघ्र दल, केंद्रीय सुरक्षा दलाचे पथक, राज्य राखीव पोलीस दलाचे पथक तैनात असेल. आत गेल्यावर बाहेर येण्याची मुभा नाही. सीसीटीव्हीच्या नजरेसमोर मतमोजणी मतमोजणी केंद्रावर विधानसभा मतदार संघनिहाय १४ टेबल असतील. यासर्व प्रक्रियेवर सीसीटीव्हीची नजर असेल. मीडियासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. मतमोजणीदरम्यान जवळपास अडीच हजारांवर लोक मतमोजणी केंद्रावर उपस्थित राहतील.