शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

१००, १०१ क्रमांकाचा दुरुपयोग

By admin | Updated: November 22, 2015 00:17 IST

अतिसंवेदनशील कामकाज करणाऱ्या पोलीस व अग्निशमन विभागाचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी १०० व १०१ फोन क्रमांकावर येणाऱ्या बोगस कॉलच्या दुरुपयोगाने वैतागले आहेत.

वैभव बाबरेकर अमरावतीअतिसंवेदनशील कामकाज करणाऱ्या पोलीस व अग्निशमन विभागाचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी १०० व १०१ फोन क्रमांकावर येणाऱ्या बोगस कॉलच्या दुरुपयोगाने वैतागले आहेत. बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे या विभागाच्या कामकाजात व्यत्यय येत आहेत. मात्र, आजपर्यंत यासंदर्भात तक्रार करण्याची तसदी सुध्दा दोन्ही विभागाने घेतली नाही. जिल्ह्यात गुन्हेगारीसंदर्भात कोणत्याही प्रकारची घटना घडल्यास नागरिकांच्या मदतीसाठी १०० क्रमांकाची सुविधा आहे. हा पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक असून त्यावर फोन केल्यास नागरिकांना काही वेळात मदत मिळते. त्याच प्रमाणे आपातकालिन स्थिती किंवा आगिच्या घटनांमध्ये मदतीसाठी १०१ क्रमांकाची सुविधा नागरिकांसाठी आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून या दोन्ही फोन क्रमांकावर बोगस कॉलचा अधीक येत आहे. या बोगस कॉलला दोन्ही विभाग वैतागले आहेत. यावर आजपर्यंत बीएसएनएलकडे तक्रार सुध्दा करण्यात आली नाही. या समस्येसंदर्भात माहिती घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधी भारतीय दूर संचार निगम कार्यालयात गेले. मात्र, बोगस कॉलविषयी पोलीस व अग्निशमन विभागाची तक्रार नसल्याचे सांगण्यात आले. या क्रमांकावर शहरातील व विदर्भाबाहेरील बोगस कॉल येत असल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण होत आहे.या बोगस कॉलवर संवाद साधण्यात दोन्ही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळ गमावावा लागत आहे. यामध्ये बहुतांश बोगस कॉल मध्यरात्रीला येत असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आजच्या अत्याधुनिक युगात इंटरनेटने जग जुळले आहे. मात्र, बोगस कॉल बंद करण्यास दोन्ही प्रशासकीय विभाग अद्याप पर्यंत हतबल आहे. या फोनवर कॉलर आयडी असतानाही बोगस कॉलवर कारवाई होत नाही. हे विशेष.