शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मिशन नीट, जेईई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचा प्रारंभ, आदिवासी विद्यार्थी डॉक्टर, अभियंते घडविण्याचा निर्धार अमरावती : आदिवासी विकास विभागाने डोंगरी, दुर्गम ...

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचा प्रारंभ, आदिवासी विद्यार्थी डॉक्टर, अभियंते घडविण्याचा निर्धार

अमरावती : आदिवासी विकास विभागाने डोंगरी, दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना डॉक्टर, अभियंते होता यावे, यासाठी मिशन नीट, जेईई उपक्रमांची पायाभरणी केली आहे. नीट, जेईई शिकवणींचा खर्च ‘ट्रायबल’ उचलणार आहे. नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर अप्पर आयुक्त कार्यालयअंतर्गत २५ एकात्मिक प्रकल्पांत दहावी, बारावीतील विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याना याचा लाभ मिळणार आहे.

‘मिशन नीट, जेईई २०२१’ या प्रकल्पाच्या पहिल्या टप्पाचा प्रजासत्ताकदिनी किनवट प्रकल्प कार्यालयाने नांदेड येथून माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ऑनलाईन प्रारंभ करण्यात आला. यावेळी नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन इटणकर, आदिवासी विकास विभाग अमरावतीचे अप्पर आयुक्त विनोद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार बालाजी कल्याणकर, मोहन हंबर्डे, आरसीसीचे मोटेगावकर, आदी ऑनलाईन उपस्थित होते.

या उपक्रमाचे संकल्पक साहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण पूजार यांनी प्रास्ताविक केले. अमोल मेटे यांनी संचालन केले.

बॉक्स

पथदर्शी प्रकल्प ठरणार

राज्यात दहावी, बारावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नीट, जेईई मार्गदर्शन प्रकल्पाचा प्रारंभ झाला. हा प्रकल्प राज़्यात पथदर्शी ठरेल, असा आशावाद पाहुण्यांनी मनोगतातून व्यक्त केला. गत काही दिवसांपूर्वी मेळघाटातील १३ आदिवासी विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणासाठी पात्र ठरले. या विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परीक्षा देऊन डॉक्टर होण्याचा मार्ग शोधला. अशाच प्रकारे मिशन नीट, जेईईदेखील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरणार असल्याचे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त विनोद पाटील यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.