शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

'प्रयास'चे मिशन छत्री तलाव

By admin | Updated: May 21, 2015 00:24 IST

प्रयास संस्थेकडून निर्मल अमरावती अभियानांतर्गत मिशन छत्री तलाव स्वच्छता मोहिम मंगळवारपासून सुरु ..

स्वच्छता मोहीम : निर्मल अमरावती अभियानाला सुरुवातअमरावती :प्रयास संस्थेकडून निर्मल अमरावती अभियानांतर्गत मिशन छत्री तलाव स्वच्छता मोहिम मंगळवारपासून सुरु करण्यात आली. प्रयास-सेवांकूरचे संचालक अविनाश सावजी यांच्यासह ५० ते ६० पदाधिकाऱ्यांनी छत्री तलावाच्या स्वच्छता मोहिमेत पुढाकार घेतला आहे. शहरातील निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या छत्री तलावात काडी-कचरा, मुर्त्यां, प्लास्टिक व अनावश्यक झुडुपे वाढली आहेत. त्यामुळे स्वच्छता अभियानातून छत्री तलावाचे वैभव जपण्याचे कार्य प्रयास-सेवांकूरने सुरु केले आहे. भविष्यात पाणी टंचाईची समस्या जाणवू नये, शहर अधिक स्वच्छ, आरोग्यदायी बनावे. त्याकरिता नागरिकांनी एकत्रित येऊन स्वच्छतेचा वसा हाती घेतला पाहिजे. या उद्देशाने प्रयासचे अनिवाश सावजी यांनी मिशन छत्री तलाव चा उपक्रम हाती घेतला आहे. श्रमदानातून सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत तलावाची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली असून त्यामध्ये जवळपास १ ट्रक प्लास्टिक व १ ट्रक पीओपीच्या मूर्त्या गोळा करण्यात आल्या. येत्या रविवारपर्यंत रोज सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यानंतर दर रविवारी नियमित सुरु ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी अभियानाला महिला, पुरुष व युवकांनी प्रतिसाद दिला असून मार्निग वॉक करिता जाणारेही सहभागी झाले. सेवांकूरचे अविनाश सावजी यांच्या नेत्तृत्वात गजानन ओक, नंदू गांधी, छोटू वरणगांवकर, राजू देव, अंजली देव, अश्विनी गुडधे, प्रशांत वानखडे, राजू महल्ले, कुमार बोबडे, विकास केमदेव, प्रशांत बोंडे, जयंत बल्लाळ, संजीव अढाव, विनोद देशमुख आदीनी छत्री तलाव स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला आहे.महापालिकेनेही लावला हातभारप्रयासतर्फे सुरु झालेल्या मिशन छत्री तलाव उपक्रमात महापालिका प्रशासनानेही हातभार लावला. आरोग्य अधिकारी सोनी व जाधव यांनी तलावातील प्लास्टिक गोळा करण्यात सहभाग नोंदविला. तसेच महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी तलावातील काडी-कचरा वेचण्यास मदत केली.