अल्पवयीनाने केला सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST2021-07-20T04:10:46+5:302021-07-20T04:10:46+5:30

अमरावती : दहाव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १४ वर्षीय मुलाने सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना राजापेठ ...

A minor sexually assaulted a six-year-old girl | अल्पवयीनाने केला सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीनाने केला सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

अमरावती : दहाव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १४ वर्षीय मुलाने सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना राजापेठ ठाणे हद्दीतील एका नगरात १७ जुलै रोजी रात्री साडेसहा वाजताच्या सुमारास अपार्टमेंटच्या खाली घडली. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलीस सूत्रांनुसार, अल्पवयीन आरोपीला बाल न्यायालयासमोर सोमवारी हजर केल्यानंतर बाल सुधारगृहात पाठविण्याचे आदेश देण्यात आले, तर मुलीला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२) (जे), २ (एन) ३७६ अ, ब, ३७७ पोक्सो कलम ४ अंतर्गत गुन्हा नोंदविला. मुलीला अपार्टमेंटच्या तळमजल्यावर नेऊन अत्याचार करण्यात आला. पुढील तपास राजापेठच्या महिला पोलीस अधिकारी करीत आहेत.

Web Title: A minor sexually assaulted a six-year-old girl