शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिज तस्करांचा हैदोस कायम

By admin | Updated: February 25, 2016 00:07 IST

तालुक्यातील रेती लिलावाला मुहूर्तच सापडत नसल्याचा फायदा रेती तस्करांनी उचलण्याचा सपाटा सुरू केला आहे.

श्यामकांत पाण्डेय धारणीतालुक्यातील रेती लिलावाला मुहूर्तच सापडत नसल्याचा फायदा रेती तस्करांनी उचलण्याचा सपाटा सुरू केला आहे. यात महसुली नदी-नाल्यांसह व्याघ्र प्रकल्पातील नद्यांवर सुद्धा तस्करांनी आपला अधिकार गाजवित अवैध उत्खनन धडाक्यात सुरू केले आहे तर महसूल अधिकारी आणि व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने गौणखनिज तस्करांचे चांगलेच फावले आहे.धारणीपासून २२ किलोमीटर अंतरावरील पाटीया गावाच्या पूर्वेस उत्तर-दक्षिणवाहिनी भंवर नदी आहे. या नदीच्या तांगडपाटी घाटात पाटीया येथील ट्रॅक्टर मालकाने हैदोस घातला आहे. त्या ट्रॅक्टर मालकाने गावातील घरकूलधारकांना रेती व डब्बरचे अवैध उत्खनन करून लाभार्थ्यांना पुरवठा केला जात. यासाठी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न काढता व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीतील भंवर नदीपात्रातून अवैध उत्खनन करून हा पुरवठा सुरू आहे. या ट्रॅक्टर मालकाच्या दादागिरीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. घरकूल लाभार्थ्यांसह गावात सुरू असलेल्या पाणी पुरवठा टाकीचे बांधकामातही हाच रेती पुरवठा सुरू आहे. रेतीसाठी प्रती ब्रास २ हजार तर डब्बरसाठी प्रती ब्रास १५०० रुपये उकळले जात आहेत. रेती व डब्बरची कोणतीही रॉयल्टी या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर मालकाने न दिल्याने याची चौकशी तहसीलदारांनी करण्याची आवश्यकता आहे.गावात शेकडो ब्रास रेती व डब्बर याच पोलीस पाटीलच्या ट्रॅक्टरद्वारे करण्यात आल्याने याला स्थानिक तलाठ्याचीही कृपा असल्याचे बोलले जाते. याबाबत एसडीओ एस. षणमुगराजन यांचेशी संपर्क केला असता त्यांनी एका पथकाची पाटियाकडे रवानगी केल्याचे सांगितले. उत्खननाने महसूल तर बुडत आहेच. पण पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.