शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मास्कमुळे त्वचेला सुटतेयं प्रचंड खाज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा वापर, श्वास गुदमरत असल्याच्या तक्रारी अमरावती : कोरोना काळात मास्कचा वापर वाढल्याने त्वचेसंदर्भातील आजार भेडसावत आहेत. ...

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा वापर, श्वास गुदमरत असल्याच्या तक्रारी

अमरावती : कोरोना काळात मास्कचा वापर वाढल्याने त्वचेसंदर्भातील आजार भेडसावत आहेत. यासाठी मास्क व सॅॅनिटायझरचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. तोंडावर सातत्याने मास्क राहत असल्याने त्वचेला घाम सुटत असून, यामुळे त्वचारोग उद्भवू शकतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मास्कचा वापर करावा. तसेच सॅनिटायझरचासुद्धा प्रमाणातच वापर करावा. सॅनिटायझरच्या अतिवापरामुळेही त्वचारोग होण्याची दाट शक्यता असते. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण असते. अल्कोहोलमुळे हाताचा ओलावा शोषून घेतला जातो व हात कोरडे होतात. यामुळे हाताला भेगाही पडण्याची शक्यता असते. हाताची, बोटाची त्वचा देखील निघते. तसेच सॅनिटायझर लावल्यानंतर कुठल्याही ज्वलनशील पदार्थाला स्पर्श करू नये, हात भाजण्याची शक्यता असते. सॅनिटायझरपेक्षा साबण, पाण्याने हात धुणे सोयीचे ठरते.

बॉक्स

मास्क आवश्यकच, पण असे करा रक्षण...

डिस्पोजेबल मास्कचा पुन्हा वापर करू नये. सतत मास्कला हात लावू नये. यामुळे हातावरील जंतू मास्कला लागू शकतात. एकसारखे मास्क लावून राहू नये, कापडी मास्क स्वच्छ व जंतुविरहित असेल, याची खात्री करून घ्यावी. एकच मास्क सलग दोन-तीन दिवस वापरू नये. यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढतो व त्वचेसंबंधित आजार होऊ शकतो.

बॉक्स

सॅनिटायझरपेक्षा साबणच बरा !

१) सॅनिटायझर वारंवार वापरल्याने हाताला खाज सुटते. हे टाळण्यासाठी घरी हात धुण्यासाठी साबणाचा वापर करावा. सतत सॅनिटायझरचा वापर टाळावा.

२) शक्यतो हात साबण लावूनच पाण्याने धुवावेत. सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे त्वचारोग होऊ शकतो.

सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचा समावेश राहत असल्याने सॅनिटायझर लावल्यानंतर ज्वलनशील पदार्थाला स्पर्श करू नये.

३) पावसाळा सुरू असून, सतत मास्कचा वापर करणे शक्य होत नाही. पावसात मास्क ओले होत असल्याने चेहऱ्यावर ओलसर मास्क अधिक वेळ ठेवल्यास त्वचेसाठी धोकादायक ठरणारे आहे.

---------------

कोट

त्वचा विकाराचे रुग्ण वाढले

मास्कचा सातत्याने वापर केल्याने त्वचारोग उद्भवतो. असे आढळून आल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व निदान करून घ्यावे. मास्कचा वापर करण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. नितीन वानखडे, वैद्यकीय अधिकारी.

कोट :

कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर अतिशय आवश्यक आहे. शक्यतो एन-९५ मास्क वापरावा. मास्कच्या वापरामुळे त्वचेवर पुरळ आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य मास्क वापरावा. शक्यतो प्रत्येकवेळी साबणानेच हात स्वच्छ धुवावेत. जेथे शक्य नसेल त्याचवेळी सॅनिटायझरचा वापर करावा.

- डॉ. वीरेंद्र सावजी, त्वचारोग तज्ज्ञ.