शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST

---- रेतीसह ट्रॅक्टर जप्त पथ्रोट : नजीकच्या आरेगाव शिवारात साडेतीन लाखांचा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर व सात हजारांची रेती पथ्रोट पोलिसांनी ...

----

रेतीसह ट्रॅक्टर जप्त

पथ्रोट : नजीकच्या आरेगाव शिवारात साडेतीन लाखांचा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर व सात हजारांची रेती पथ्रोट पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी १४ फेब्रुवारी रोजी राजेश मनोहर हेकडे (२६) व दीपक मनोहर सोनपुरे (३३, दोन्ही रा. वडगाव फत्तेपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

------------

जिल्हा सामान्य रुग्णालयात इसमाचा मृत्यू

अमरावती : खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळजागीर वाडा येथील इसमाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. गजानन पांडुरंग शेलोकार (५८) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण पुढे आलेले नाही.

---------

शेताच्या कुंपणाचे पोल उखडले

जरूड : वरूड तालुक्यातील टेंभूरखेडा मार्गावरील अजय वसंतराव विटाळकर (४२, रा. वरूड) याच्या शेताच्या कुंपणाचे पोल उखडून त्यांना शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी भादंविचे कलम २९४, ४२७, ३४ अन्वये कमला दिनेश मोरे व भूषण दिनेश मोरे (रा. वरूड) यांच्याविरुद्ध रविवारी गुन्हा नोंदविला.

----------

वरूड येथे युवकाला मारहाण

वरूड : शहरातील नया दायरा येथे शेख शब्बीर शेख मुख्तार (२८, रा. शहापूर पुनर्वसन) याला तेथीलच एका युवतीने संशयातून शिवीगाळ केली व तिचा नियोजित वर सलमान पप्पू मिया याने पावड्याने डोक्यावर मारले. तो बहिणीकडे रेशन घेऊन आला होता. याप्रकरणी वरूड पोलिसांनी रविवारी भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

-----------------