शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत मॅराथॉन बैठकी : अधिकाराचा मुद्दा ऐरणीवर

By admin | Updated: May 7, 2014 01:12 IST

महापालिकेला शासनाकडून प्राप्त २५ कोटी रूपयांतून मूलभूत सोई

 १२.५० कोंटी रूपयांच्या विकास कामांवर खल

अमरावती : महापालिकेला शासनाकडून प्राप्त २५ कोटी रूपयांतून मूलभूत सोई सुविधांची बडनेरा मतदार संघात करावयाच्या १२.५० कोटी रूपयांच्या विकास कामावरून खल सुरू झाले आहे. निधी वाटपाचे अधिकार कुणाला? हा मुद्दा सर्वत्र चर्चिला जात आहे. आ.रवी राणा यांच्या पत्रावर उपमहापौरांनी विकास कामे सुचविल्याने पदाधिकार्‍यांचा ‘इगो’ जागा झाला आहे. परिणामी मॅराथॉन बैठकीचे सत्र सुरू झाले आहे.

स्थानिक संस्था कराची तूट भरून काढण्यासाठी शासनाने महापालिकेला गतवर्षी २५ कोटी रूपयांचे अनुदान दिले होते. १२.५० कोटी रूपये याप्रमाणे अमरावती आणि बडनेरा मतदारसंघात विकास कामे करण्याचे ठरविण्यात आले. त्यापैकी अमरावती मतदारसंघात १२.५० कोटी रूपयांची विकास कामे करण्यात आली. मात्र बडनेरा मतदारसंघातील विकास कामे ही महापालिकाऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात यावी. तसेच १२.५० कोटी रूपयांचा निधी हा महापालिकेने सार्वजनिक बांधकाकडे वळती करावा, असे पत्र राणा यांनी शासनाकडून त्यावेळी आणले होते. या पत्राच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी पुढील कार्यवाही केली.

परंतु राणांच्या या खेळीला लगाम लावण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना, बसपा पदाधिकार्‍यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेत याचिका सादर केली. या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने शासनाची भूमिका अमान्य करीत १२.५० कोटींची कामे ही महापालिका यंत्रणाच राहील, असा निर्णय दिला. दरम्यान लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले. आचारसंहिता सुरू झाल्यामुळे या विकास कामांचा निर्णय झाला नाही.हे अनुदान अखर्चिक राहिले. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्याचे आदेश धडकताच १२.५० कोटींच्या रकमेतून विकास कामांसाठी निधी आपल्यालाच कसा जास्त मिळेल, याची रणनीती आखण्याची तयारी नगरसेवकांनी चालविली आहे. तर दुसरीकडे पक्षनेता, विरोधी पक्षनेता व गटनेत्यांनी या अनुदान वाटपासाठी मॅराथॉन बैैैैैठकी चालविल्या आहेत. (प्रतिनिधी)