शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा पराभवावर मंथन, विधानसभा निवडणुकीवर लक्ष

By admin | Updated: July 27, 2014 23:31 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांचा पदग्रहण समारंभ रविवारी येथे पार पडला. यावेळी जिल्ह्यातील नेत्यांनी लोकसभा पराभवावर मंथन तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या

राष्ट्रवादीची बैठक : निर्धार मेळाव्याची तयारीअमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांचा पदग्रहण समारंभ रविवारी येथे पार पडला. यावेळी जिल्ह्यातील नेत्यांनी लोकसभा पराभवावर मंथन तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या कशी वाढेल याविषयी लक्ष वेधले.स्थानिक पंचवटी चौक नजीकच्या बाबासाहेब वऱ्हाडे मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. वऱ्हाडे यांची राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यावर पहिल्यांदाच तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष व काही विशेष पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत तत्कालीन जिल्हाध्यक्ष विजय भैसे यांनी मागील चार वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या घडामोडींबाबत माहिती दिली. राजीनामा हा वैयक्तिक कारणामुळे दिला असून कोणीही जिल्हाध्यक्ष ४ वर्षांपेक्षा अधिक काळ या पदावर काम करू शकत नाही, अन्यथा त्याचा ‘भेजा फ्राय’ होते असे ते म्हणाले. शरद पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणे हे पदाधिकाऱ्यांचे काम आहे. लोकसभा निवडणुकीत कशामुळे पराभव झाला या खोलात न जाता येत्या विधानसभा निवडणुकीत अधिक संख्येने राष्ट्रवादीचे आमदार कसे बनतील याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन करुन राष्ट्रवादीतीली अंतर्गत कलह कमी करण्याचा सल्ला त्यांनी दिला.शरद तसरे यांनी राष्ट्रवादी स्थापनेपासून आपण शरद पवार यांच्याशी जुडलो आहे. आपण कधीही कोणाच्या विरोधात जात नसताना माझा का विरोध केला जातो, असा प्रश्न या बैठकीत उपस्थित केला. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षाचे संघटन मजबूत होते. त्यामुळे राष्ट्रवादीत सर्वसामान्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारीसुद्धा ठेवावी, असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शरद तसरे, नवनीत राणा, आमदार रवी राणा, तत्कालीन जिल्हाध्यक्ष विजय भैसे, विजय काळे, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष मेघा हरणे, नीलिमा महल्ले, संगीता ठाकरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन हिवसे, गणेश रॉय, गजानन रेवाळकर, अरुण गावंडे, बाबुराव बेलसरे, आरीफ हुसैन, चंद्रशेखर देशमुख, श्रीपाल पाल, रवींद्र गायगोले आदींची उपस्थिती होती.