भाडेकरूच निघाला दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 05:00 AM2021-06-25T05:00:00+5:302021-06-25T05:00:38+5:30

७ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी दरोडा टाकण्याचे ठरविले. सायंकाळी घरात कोणीही नसताना समीर अन्य फरार असलेला आरोपींसह  महिलेच्या घरात लपवून बसला; तर मोहम्मद आवेश व  फरार असलेला दुसरा  आरोपी घरावर पाळत ठेवून होता. मात्र महिला अचानक घरात आली. तिने आरोपीला बघताच आरडाओरड केल्याने त्यांनी महिलेचे हात बांधले. त्यानंतर घरातील सर्व सोने व पैसे काढले. मात्र अचानक महिलेचे पती घरी येऊन त्यांनीही  आरडाओरड केली. 

The main facilitator of the robbery case was the tenant | भाडेकरूच निघाला दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधार

भाडेकरूच निघाला दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधार

Next
ठळक मुद्देमाधवनगरातील दरोडा प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : घरात दोन वर्षे भाडेकरू म्हणून राहिलेल्या आरोपीने इतर तिघांना सोबत घेऊन  राजापेठ ठाणे हद्दीतील माधवनगर येथे दरोडा टाकला. बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवून, पतिपत्नीचे  हातपाय बांधून त्यांनी घरातील तीन लाख ८६  हजार रुपयांचे  सोने व पैसे पळविले. या प्रकरणी गुन्हे शाखेने तपास करून दोघांना बुधवारी अटक केली. घरात दोन वर्षांपासून राहणाऱ्या भाडेकरूच मुख्य सूत्रधार असल्याची माहिती तपास पथकाच्या तपासात निष्पन्न झाली आहे. आरोपी दोन वर्षांपासून मातणे परिवाराच्या घरात  पाळत ठेवून होता. त्यानंतर त्याने त्या परिवाराची खडान‌्खडा माहिती घेऊन सदर गुन्हा पूर्णत्वास नेला. 
मुख्य सूत्रधार आरोपी समीर शहा नजीर शहा (वय २६) याला अंबाळा, ता. मोर्शी येथून पथकाने ताब्यात घेतले; तर त्याचा साथीदार मोहम्मद आरिफ (३०, रा.  गवळीपुरा) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.  समीर हा फिर्यादी शुभांगी  मातणे  यांच्या घरी वरच्या मजल्यावर भाड्याने राहत होता. त्याला शुभांगी यांचे पती हे सुवर्णकार असल्याची माहिती होती. त्यामुळे त्याच्यासह इतर तिघाजणांनी दरोड्याचा प्लॅन रचला.  ७ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी दरोडा टाकण्याचे ठरविले. सायंकाळी घरात कोणीही नसताना समीर अन्य फरार असलेला आरोपींसह  महिलेच्या घरात लपवून बसला; तर मोहम्मद आवेश व  फरार असलेला दुसरा  आरोपी घरावर पाळत ठेवून होता. मात्र महिला अचानक घरात आली. तिने आरोपीला बघताच आरडाओरड केल्याने त्यांनी महिलेचे हात बांधले. त्यानंतर घरातील सर्व सोने व पैसे काढले. मात्र अचानक महिलेचे पती घरी येऊन त्यांनीही  आरडाओरड केली. 
बिंग फुटल्याचे लक्षात येताच दोघांनी  महिलेवर व पतीवर चाकूचा वार करून, तसेच बंदुकीचा धाक दाखवून चारही आरोपींनी घटनास्थळावरून  पळ काढला. पळ काढत असताना एक दुचाकीचालक आडवा आल्याने   त्यांनी दुचाकीचालकाला फिल्मी स्टाईल खाली पाडून हवेत दोन गोळ्या झाडल्या.

समीरविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे
समीर हा आधीच गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाने दिली आहे. त्याच्यावर नागपूर,  चांदूर बाजार व नांदगाव पेठ येथे बॅग लिफ्टिंग  प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. तो  ओळख लपवून  महिलेच्या घरी भाड्याने राहत होता. 

फरार आरोपीवरही गुन्हे दाखल
दरोडा प्रकरणातील एका फरार आरोपीवरसुद्धा काही पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत; तर अन्य एक आरोपी हा इतर राज्यातील असल्याने शोधपथक त्याचा शोध घेत आहे.  फरार असलेल्या ३३ वर्षीय  आरोपीने हवेत दोन बंदुकीच्या गोळ्या झाडल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली.

पाच महिन्यापूर्वीच मुख्य आरोपीचा सुगावा
घटनेनंतर जेव्हा तपासाची सूत्रे हलविली तेव्हा समीर हाच मुख्य आरोपी असल्याचे पाच महिन्यांपूर्वीच कळले होते. मात्र तोे हाती लागत नव्हता. त्यानंतर मात्र गोपनीय माहिती घेऊन दोघांना ताब्यात घेतले. आणखी दोघांना अटक करू व त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करू, पोलीस आयुक्त आरती सिंह म्हणाल्या.

 

Web Title: The main facilitator of the robbery case was the tenant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.