शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यात मोलकरणीने चोरले २२ टीव्ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:11 IST

अनिल कडूपरतवाडा : स्थानिक अनिल टीव्ही या प्रतिष्ठानाच्या संचालकांच्या घरून तेथे काम करणाऱ्या मोलकरणीने एक-दोन नव्हे, चक्क २२ टीव्ही ...

अनिल कडूपरतवाडा : स्थानिक अनिल टीव्ही या प्रतिष्ठानाच्या संचालकांच्या घरून तेथे काम करणाऱ्या मोलकरणीने एक-दोन नव्हे, चक्क २२ टीव्ही लंपास केल्याची तक्रार परतवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यातील काही टीव्ही हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे.

प्रतिष्ठानचे संचालक जयसिंघाणी यांचे वास्तव्य लाल पूल परिसरात सिंधी कॉलनी येथे आहे. अनेक वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या व्यवसायात असून, आपल्या राहत्या घरी, एका खोलीत ते विविध कंपन्यांच्या टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक्स साहित्य ठेवतात.

दरम्यान, आठवड्याभरापूर्वी त्या खोलीत ठेवलेले दोन टीव्ही सायंकाळी दुकानात न्यायच्या अनुषंगाने जयसिंघाणी यांनी सकाळी पाहणी केली असता, त्यांना ते दिसून आले नाहीत. यात संशय बळावल्याने त्यांनी पाळत ठेवली असता, घरी काम करणाऱ्या मोलकरणीने एका युवकाला हाताशी धरून टीव्ही लंपास केल्याचे कबूल केले. अशा प्रकारे घरातून आतापर्यंत २२ टीव्ही चोरीला गेल्याची बाब जयसिंघाणी यांच्या लक्षात आली.

चोरीला गेलेल्या या एका टीव्हीची किंमत १५-१६ हजार रुपये असताना, चोरणाऱ्या दोघांनी ते केवळ दोन ते तीन हजार रुपयात विकले. ज्यांनी हे चोरीचे टीव्ही घेतले होते, त्यांच्याकडून यातील काही टीव्ही हस्तगत करण्यात यश आले आहे.

दरम्यान, घटनेच्या अनुषंगाने परतवाडा पोलीस ठाण्यात जयसिंघाणी यांनी ५ फेब्रुवारीला सायंकाळी ही माहिती दिली. त्यात मोलकरणीवर संशय व्यक्त केला. त्या आधारावर मोलकरीण महिलेसह एका युवकाला पोलिसांनी चौकशीकरिता बोलावल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, घटनेच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार वृत्त लिहिस्तोवर दाखल करण्यात आलेली नाही. चोरीला गेलेले टीव्ही हस्तगत होत असल्यामुळे जयसिंघाणी यांनी टीव्ही लंपास करणाऱ्यांप्रति मवाळ धोरण स्वीकारल्याची माहिती आहे.

दरम्यान, स्टॉक व्हेरिफिकेशन सुरू आहे. यानंतरच चोरीला गेलेल्या टीव्ही संचांचा निश्चित आकडा सांगता येईल. सध्या पोलीसांकडे २२ टीव्ही चोरीला गेल्याची शंका व्यक्त करण्यात आली असल्याचे जयसिंघाणी यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी परतवाडा पोलीस करीत आहेत.

-------------------