जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण

By Admin | Updated: May 3, 2016 00:24 IST2016-05-03T00:24:31+5:302016-05-03T00:24:31+5:30

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

Maharashtra Day flag hoisting in Collectorate office | जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण

मानवंदना : राष्ट्रगीताची धून गुंजली
अमरावती : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली. सर्वांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. पोलिसपथकाकडुन मानवंदना स्विकारल्यानंतर जिल्हाधिकारी गित्ते यांनी उपस्थित मान्यवरांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, जिल्हा नियोजन अधिकारी रविंद्र काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी वानखडे, उपजिल्हाधिकारी गजेंद्र बावणे, उपविभागीय अधिकारी शिरसुद्धे, बी.आर.शिरभाते, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, जिल्हा सूचना अधिकारी रणवीर, विधी अधिकारी नरेंद्र बोरा अन्य वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Day flag hoisting in Collectorate office