शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

अडसडांच्या राजकीय पुनर्वसनासाठी ‘लॉबिंग’

By admin | Updated: October 26, 2014 22:34 IST

जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांचा धामणगाव रेल्वे मतदारसंघातून निसटता पराभव झाला. अडसड हे भाजपचे जुने जाणते नेते असल्यामुळे त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी समर्थक

अमरावती : जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांचा धामणगाव रेल्वे मतदारसंघातून निसटता पराभव झाला. अडसड हे भाजपचे जुने जाणते नेते असल्यामुळे त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी समर्थक सरसावले आहेत. शनिवारी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची तर अमरावतीत रविवारी केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन अडसड यांना विधानपरिषदेचे सदस्यत्व बहाल करुन राज्य मंत्रिमंडळात सहभागी करण्यासाठी जोरदार ‘लॉबींग’ चालविली आहे. ना. गडकरी हे पत्नी, मुलगा, सून व नातवासह येथील श्रीकृष्णपेठ स्थित त्यांचे मामा गजानन रहाटगावकर (पांडे) यांच्याकडे कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आले असता अरुण अडसड समर्थकांनी त्यांची भेट घेतली. नितीन गडकरी वाहनातून उतरताच त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मोठ्या संख्येने आलेल्या अडसड समर्थकांना ‘कसे काय? बरे आहे’ अशी विचारणा करीत त्यांची कैफियत जाणून घेतली. जिल्हा परिषदेचे माजी सभापती रामदास निस्ताने, भाजप तालुकाध्यक्ष विठ्ठलराव राळेकर, बबनराव गावंडे, अनिल राठी आदींनी गडकरींपुढे भूमिका मांडताना अडसडांना आमदारकी, मंत्रीपद देणे का गरजेचे आहे? हे पटवून सांगितले. अरुण अडसडांचा निसटता पराभव हा सर्वच कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजप जिंवत ठेवायची असेल तर अडसडांचे राजकीय पुनर्वसन करणे गरजेचे आहे, हे निक्षूण सांगण्यात आले. काँग्रेसचे आमदार हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. भाजप कार्यकर्त्यांना सत्तेचा वाटा मिळावा, यासाठी अडसडांना राज्यमंत्री मंडळात सामावून घेणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांपासून भाजप कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यात अडसड यांची मोलाची भूमिका राहिली. अनेकांनी पक्ष बदलले, मात्र अडसड हे भाजपात आजही कायम आहेत. अख्ख्ये आयुष्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपला वाहणाऱ्या अडसडांना न्याय मिळाला पाहिजे, ही मागणी गडकरी यांच्या पुढ्यात ठेवण्यात आली. यावेळी गडकरींनी मी केंद्रात आहे. यासंदर्भात काय करता येईल, वरिष्ठांशी चर्चा करु, असे भेटावयास आलेल्या अडसड समर्थकांना त्यांनी सांगितले. ‘नक्कीच अरुणभाऊंना न्याय देऊ’ हेदेखील सांगावयास गडकरी विसरले नाहीत.यावेळी रामदास निस्ताने, विठ्ठलराव राळेकर, बबनराव गांवडे, अनिल राठी, साहेबराव गांवडे, हरिदास राऊत, कृष्णा मारोटकर, हेमनकरण कांकरीया, मोहन इंगळे, संजय मुंदडा, अनिल तिजारे, गोविंद तिजारे, राजेश्वर निस्ताणे, वासुदेव मानकानी,धीरेंद्र खेरडे, खंडाळकर पाटील, राजेश पाठक, वसंतराव सावंत, सुरेश गायधने, मनोहर टाले, मनोहर सुने आदींनी अडसडांच्या राजकीय पुनर्वसनाची बाजू मांडली.दरम्यान सुनील देशमुख, प्रकाश भारसाकळे, प्रवीण पोटे, रमेश बुदिंले, प्रभुदास भिलावेकर, अनिल बोंडे या आमदारांसह शिवराय कुळकर्णी, रवींद्र खांडेकर, किरण पातुरकर, निवेदिता चौधरी, प्रदीप शिंगोरे, तुषार भारतीय, दिनेश सूर्यवंशी, विजय मोहता, सदाभाऊ पुंशी, संजय अग्रवाल आदी भाजप पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरींची भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.