कुष्ठरूग्ण अन् सक्रिय क्षयरुग्ण शोध अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:22 IST2020-12-03T04:22:56+5:302020-12-03T04:22:56+5:30

अमरावती : कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती, रुग्णांचा शोध व उपचाराकरिता संयुक्त कुष्ठरुग्ण शोध व सक्रिय क्षयरुग्ण शोध अभियानाला मंगळवारपासून ...

Leprosy Inactive Tuberculosis Research Campaign | कुष्ठरूग्ण अन् सक्रिय क्षयरुग्ण शोध अभियान

कुष्ठरूग्ण अन् सक्रिय क्षयरुग्ण शोध अभियान

अमरावती : कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती, रुग्णांचा शोध व उपचाराकरिता संयुक्त कुष्ठरुग्ण शोध व सक्रिय क्षयरुग्ण शोध अभियानाला मंगळवारपासून प्रारंभ झाला. जिल्ह्यात हे अभियान १६ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. यात ४.५० लाखांहून अधिक गृहभेटी देण्यात येणार आहेत.

समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना तत्काळ उपचार मिळवून देण्यासाठी या संयुक्त अभियानात आरोग्य पथकांकडून घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी पथकाला आवश्यक ती पूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलश नवाल यांनी केले आहे.

जिल्हा पिरषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ जिल्ह्यात झाला. समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण यांना लवकरात लवकर शोधून त्वरित उपचार देणे, संसर्गाची साखळी खंडित करणे, जनजागृती करणे ही अभियानाची उद्दिष्टे आहेत. अभियानात घरोघर जाऊन २२ लाख ६२ हजार ७ नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी एक महिला व एक पुरुष कर्मचारी असलेल्या १ हजार ५५१ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांचे पर्यवेक्षण ३१० पर्यवेक्षक करतील. यावेळी आरोग्य उपसंचालक एम. एस. फारुखी, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, डॉ. के. एस. वासनिक, डॉ. अंकुश सिरसाट, डॉ. दिलीप निकोसे, डॉ. रेवती साबळे, डॉ. दीपक च-हाटे, विनोद प्रधान, दीपक गडलिंग आदी उपस्थित होते.

Web Title: Leprosy Inactive Tuberculosis Research Campaign