शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पॅसेंजर व्हाया बडनेरा सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST

अमरावती-नागपूर पॅसेंजर गाडीला नवा लुक देण्यात आला. ‘मॉडीफाईड मल्टिपल युनिट’ अशा अद्ययावत प्रणालीवर मेमू रेल्वे गाडी तयार करण्यात आली. मुंबईत धावणाऱ्या लोकल ट्रेन समान ही गाडी आहे. १६ डब्यांच्या या गाडीची आसन व्यवस्था सुटसुटीत आहे. नवा लुक देण्यापूर्वी ही पॅसेंजर गाडी व्हाया बडनेरा रेल्वेस्थानकाहून जात होती. या पॅसेंजरला बडनेऱ्यातून मोठा प्रवासी वर्ग येत होता.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : खासदारांना साकडे

बडनेरा : अमरावती-नागपूर मेमू पॅसेंजर गाडी १५ दिवसांपासून कॉडलाईनने नागपूरकडे रवाना होत आहे. बडनेरावासीयांसह प्रवाशांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या गाडीला पूर्वीप्रमाणे व्हाया बडनेरा सोडण्याची अशी मागणी जोर धरून आहे. याकडे खासदार नवनीत राणा यांनी लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
अमरावती-नागपूर पॅसेंजर गाडीला नवा लुक देण्यात आला. ‘मॉडीफाईड मल्टिपल युनिट’ अशा अद्ययावत प्रणालीवर मेमू रेल्वे गाडी तयार करण्यात आली. मुंबईत धावणाऱ्या लोकल ट्रेन समान ही गाडी आहे. १६ डब्यांच्या या गाडीची आसन व्यवस्था सुटसुटीत आहे. नवा लुक देण्यापूर्वी ही पॅसेंजर गाडी व्हाया बडनेरा रेल्वेस्थानकाहून जात होती. या पॅसेंजरला बडनेऱ्यातून मोठा प्रवासी वर्ग येत होता. परिसरातील खेड्यांवरील प्रवाशांसाठी ही गाडी अत्यंत सोईची होती. विद्यार्थी रेल्वेस्थानकाहून बडनेऱ्यात येत होते. मात्र नवा लुक दिल्यानंतर ही पॅसेंजर अमरावतीहून थेट कॉड लाईनने नागपूरकडे जात आहे. बडनेरा वगळल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पूर्वीप्रमाणे या गाडीला व्हाया बडनेरा सोडावे तसेच येताना बडनेराहून अमरावतीकडे रवाना करण्यात यावे, अशी मागणी आहे.

मेमू पॅसेंजर गाडी व्हाया बडनेरा गेली पाहिजे. बडनेऱ्यातून या गाडीला मोठा प्रवाशीवर्ग आहे. जंक्शन स्टेशन असणाऱ्या बडनेरा स्टेशनचे यामुळे महत्त्व कमी होत आहे.
- नितीन मांजरे, बडनेरा

अमरावती-नागपूर पॅसेंजर गाडी पूर्वीप्रमाणे व्हाया बडनेरा यावी. ही गाडी बडनेºयातून जात नसल्याने प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी.
- गौरव बांते, बडनेरा

टॅग्स :railwayरेल्वे