शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

गरजदरी येथे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST

वनोजा बाग : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गरजदरी धरणाला अवैध उत्खनन करणाऱ्यांचे ग्रहण लागले असून महसूल विभाग, जलसंपदा ...

वनोजा बाग : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गरजदरी धरणाला अवैध उत्खनन करणाऱ्यांचे ग्रहण लागले असून महसूल विभाग, जलसंपदा विभाग याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याची चर्चा आहे. अंजनगाव सुर्जी येथून जवळच असलेल्या, परंतु चिखलदरा महसूल विभागाचा भाग असलेल्या गरजदरी येथे निसर्गाने आपल्या सौदर्याची लयलूट केली आहे. गरजदरी येथे पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेले धरण आहे. धरणाला लागून वस्ती आहे. या धरणाला लागूनच अंजनगाव सुर्जी येथील काही धनदांडग्यांची शेती आहे. शेत हे नावालाच असून शेतात असलेले मुरुमाचे पहाड त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. धरणाला लागुन असलेल्या शेतात काही महिन्यांपूर्वी एक-दोन मोठे पहाड होते. आज ते तेथून गायब झाले आहेत. दररोज या ठिकाणहून अवैध मुरुम उत्खननाचे ट्रक अंजनगाव सुर्जी येथून विशेषत: तहसील कार्यालयासमोरून भरून जातात. परंतु, आजपर्यंत ही या ट्रकवर कुठलीच कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. पाटबंधारे विभागालाही धरणाच्या बाजूने अवैध उत्खनन होत असताना कारवाई करणे अपेक्षित वाटले नाही. त्यामुळे या अवैध उत्खननात सर्वांचेच हात ‘ओले’ झाल्यांचा संशय व्यक्त केला जात आहे. हा भाग जरी चिखलदरा तालुक्यात येत असला तरी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नागरिकांची धरणावर ये-जा असते. जर अशाप्रकारे निसर्गाने उधळण केलेल्या भागाचे सौंदर्य नष्ट केले जात असेल आणि या अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई होत नसेल, तर निसर्गप्रेमींनी दाद कुणाकडे मागावी, हा प्रश्न निर्माण होत आहे.