शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

भूस्खलनाचा धोका!

By admin | Updated: August 9, 2014 00:05 IST

बुलडाणा शहराच्या सिमारेषेवरील वस्त्या धोकेदायक; माळीण गावाच्या पुनरावृत्तीचा धोका.

सिद्धार्थ आराख /बुलडाणा
बुलडाणा शहराच्या सिमारेषेवर जवळपास १0 वस्त्या अशा आहेत की एखादी नैसर्गीक आपत्ती आल्यास येथेही पुणे जिल्ह्यातील माळीण गावाची पुनरावृत्ती होऊ शकते. माळीण गावावर डोंगर कोसळल्यामुळे हे गाव पुर्णत: मलब्याखाली गेले. बुलडाणा शहराच्या आजूबाजूला डोंगर दर्‍यामध्ये ज्या वस्त्या आहेत तेथे भुस्सखलन झाल्यास ही घरे दरीमध्ये कोसळण्याची भिती आहे. असे झाल्यास या भागात बचाव पथकाला घटनास्थळावर पोहचणे सुध्दा जिकरीचे होईल.अशी स्थिती या परिसराची आहे. या संभाव्य आपत्तीचा धोका ओळखून प्रशासनाने उपाय योजना करणे गरजेचे आहे. किमान अशा धोकादायक झोपड्या वाढणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे आवश्यक झाले आहे. दिवसेंदिवस दरीच्या काठावरील घरांची गर्दी वाढतच आहे.
*टेकड्यांची झीज धोकादायक
शहराच्या पश्‍चिम व दक्षिणेकडील टेकड्यांची झीज झाली आहे. जुन्या सागर व्हिडीओच्या पाठीमागील भाग, सम्राट अशोक नगरचा काही भाग तर इकडे मुठ्ठे ले-आऊटच्या काही भागातील टेकड्यावर सुध्दा अशी धोकादायक घरे आहेत. तर सागवन रस्त्यावरील टेकड्यावर प्लॉट पाडून लोकांनी घरे बांधली आहेत. असाच प्रकार सुंदरखेड विजय नगर भागासह संगम तलावाच्या काठावर आहे. या भागात सुध्दा अनेकांची घरे टेकड्यांच्या पायथ्याशी गेले आहेत. हा भाग फारसा धोकादायक नसला तरी हळु हळु या टेकड्यांची झीज झाल्यास या घरांना धोका होऊ शकतो. यासाठी रहिवासीयांनी स्वत: पुढाकार घेऊन सुरक्षित स्थळी जाणे गरजेचे आहे.
*कपार खोदून बांधली घरे
बुलडाणा शहराच्या उत्तरेकडील भागात आतारी नामक वस्ती आहे. वनखात्याच्या जमीनीवर डोंगर दर्‍यामध्ये लोकांनी अवैधरित्या घरे बांधून येथे अतिक्रमण केले आहे. हा परिसर सुध्दा धोकादायक आहे. त्यापुढे हिंदु स्मशानभुमिला लागून अनेक लोकांनी टेकडीच्या पायथ्याशी झोपड्या बांधल्या आहेत. त्याला लागूनच पुढे भीमनगर मधील अनेक नागरीकांनी डोंगर कपार्‍यात अवैध घरे बांधली आहेत. त्यांच्या घरापर्यंत जाणे म्हणजे कसरत करावी लागते. बाजूलाच सिनेमा टॉकीजच्या पाठीमागील भागात सुध्दा टेकड्यांच्या कपार्‍यामध्ये अनेकांची घरे आहेत.
*सपाटीकरण करून बांधल्या झोपड्या
बुलडाणा शहराच्या पुर्वेकडील भागात क्रांती नगरला लागून असलेल्या कत्तलखान्याच्या पाठीमागे मोठी दरी आहे. या दरीच्या पुढे जंगल आहे. या कत्तलखान्याच्या खाली दरीत आता जमीन सपाट करून लोकांनी अवैधरित्या घरे बांधून वस्ती केली आहे. विशेष म्हणजे या भागात जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. त्याला लागूनच असलेल्या मिर्झा नगर भागात सुध्दा दरीमध्ये जावाई नगर म्हणून स्वतंत्र वस्ती तयार करण्यात आली आहे.या दरीच्या खालच्या भागात टेकड्यांचे सपाटीकरण करून लोकांनी टीनपत्र्यांची घरे बांधली आहेत. आग लागल्यास किंवा दुर्दैवाने एखादी नैसर्गीक आपत्ती कोसळल्यास या भागात कोणतेही वाहान जावू शकत नाही. रस्ता नाही, नाल्या नाहीत त्यामुळे लोकांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत.
*नगर पालिका मात्र अनभिज्ञ
बुलडाणा पालिकेच्या क्षेत्रात असलेल्या या वस्त्यांची मात्र पालिकेच्या दप्तरी कोणतीही नोंद नाही. अशा धोकादायक वस्त्या आहेत काय? असल्यास त्यांची काय स्थिती आहे. तेथील नागरीकांच्या जिविताला काही धोका होऊ शकतो काय, याची सुध्दा महिती पालिकेला नाही. बुलडाणा नगर पालिका मुख्याधिकारी संजीव ओव्हळ यांनी डोंगर दर्‍यामध्ये अवैधरित्या घरे बांधलेल्या नागरीकांची स्वतंत्र अशी नोंद नसल्याचे सांगीतले. माळीणच्या घटनेनंतर अशा धोकादायक घराची नोंद ठेवण्यासाठी आता स्वतंत्र व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.