शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम, नगररचना विभागात समन्वयाचा अभाव

By admin | Updated: July 30, 2014 23:46 IST

शासनाकडून विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये आले असताना महापालिकेतील बांधकाम आणि सहायक संचालक नगररचना विभागातील समन्वयाच्या अभावामुळे कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत,

लोकप्रतिनिधी नाराज : ‘स्मार्ट सिटी’ पुरस्काराने अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुराअमरावती : शासनाकडून विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये आले असताना महापालिकेतील बांधकाम आणि सहायक संचालक नगररचना विभागातील समन्वयाच्या अभावामुळे कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, असा आरोप करुन लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर प्रचंड नाराजी वर्तविली. मात्र, महापालिकेला ‘स्मार्ट सिटी’ पुरस्कार मिळाल्याबद्दल आयुक्त अरुण डोंगरे यांचा आ. रावसाहेब शेखावत यांनी बुधवारी सत्कार करुन कौतूकदेखील केले.महापालिकेत आयुक्तांच्या दालनामध्ये बुधवारी विविध विकास कामांच्या आढाव्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत शहरात सुरु असलेल्या विकासकामांच्या परिस्थितीबाबत मंथन करण्यात आले. स्थानिक बाबा चौक ते लेखुमल मिठाईवाला चौकापर्यंत सुरु असलेले रस्ता निर्मितीचे बांधकाम आणि सहायक संचालक नगररचना विभागाच्या समन्वयाअभावी काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानातील मंजूर घरकुलांचा विषय हाताळताना शेखावत यांनी गरिबांना त्यांच्या हक्काचे घरकूल देण्यास दिरंगाई करणाऱ्यास धडा शिकविला जाईल, अशी तंबी दिली. शहरात नियमबाह्य उभारले जाणाऱ्या मोबाईल टॉवरवर अंकुश ठेवण्याचे निर्देश आयुक्तांना दिले. राजकमल चौक व गर्ल्स हायस्कूल चौकात सौंदर्यीकरणाची कामे लवकरच सुरु करण्याचे ठरविण्यात आले. पंधरवाड्यात सौंदर्यीकरणाला सुरूवात करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. विकास कामे त्वरित पूर्ण करुन जनतेला दिलासा मिळावा, या अनुषंगाने कार्यवाहीच्या सूचना दिल्यात. बैठकीला महापौर वंदना कंगाले, आयुक्त अरुण डोंगरे, अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम, सुगनचंद गुप्ता, विलास इंगोले, संजय अकर्ते, नगरसेवक भारत चव्हाण, अमोल ठाकरे, नगर रचना अधिकारी सुरेंद्र कांबळे, अभियंता पोतदार उपस्थित होते.