शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य विकास महारोजगार मेळाव्याचा हिशेब जुळेना

By admin | Updated: March 3, 2017 00:20 IST

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विभागीय मुख्यालयाच्यावतीने मे २०१६ मध्ये पार पडलेल्या महारोजगा

आठ लाख रुपये गेले कुठे ? : बँकेत जमा झालेली रक्कम गायबअमरावती : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विभागीय मुख्यालयाच्यावतीने मे २०१६ मध्ये पार पडलेल्या महारोजगार मेळाव्यात झालेल्या खर्चाचा हिशेब जुळत नाही. मेळाव्यासाठी १४ लाख रूपये मंजूर झाले असताना केवळ सहा लाखांच्या खर्चाची नोंद आहे. त्यामुळे आठ लाख रूपये गेले कुठे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या उपस्थितीत २८ मे २०१६ रोजी अमरावती विभागातील विद्यार्थ्यांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या अनुषंगाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय मुख्यालयाने पाठविलेल्या ई-मेलद्वारे १४ लाख रूपयांच्या अंदाजपत्रकास राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मान्यता प्रदान केली होती. महारोजगार मेळाव्याच्या आयोजनामध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी)चा समावेश होता. त्यामुळे मेळाव्याच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत ६ लाख रूपये आरटीजीएसद्वारे ‘डीडीओ’ खात्यात वर्ग करण्यात आले. ही रक्कम स्टेट बँक आॅफ इंडिया, शाखा कॅम्प येथे ११०६२२६६६५० याखात्यात जमा करण्यात आली. मात्र, अंदाजपत्रकानुसार मंजूर उर्वरित ८ लाख रूपये हे राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तांनी पाठविल्याची, विश्वसनीय माहिती आहे. प्राप्त ८ लाखांची रक्कम स्थानिक देना बँकेत जमा करण्यात आली होती. परंतु या ८ लाखांच्या खर्चाचा कुठेही ताळमेळ जुळत नाही. ही ८ लाखांची रक्कम कुठे, कशी खर्च करण्यात आली, हे कोणीही सांगू शकत नाही. महारोजगार मेळाव्यासाठी आलेल्या एकूण खर्चाचा हिशेब जुळत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. ८ लाखांच्या खर्चाबाबत कौशल्य विकासमधील अधिकारी ‘सायलेंट’ आहेत. महारोजगार मेळाव्याचा केवळ ६ लाखांच्या खर्चाचा हिशेब आणि संबंधित देयके सादर करण्यात आली आहेत. मात्र, राज्य शासनाने पाठविलेल्या ८ लाखांच्या निधीबाबत कौशल्य विकासात सारे काही ‘आॅलेवल’ दर्शविले जात आहे. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातही अधिकारी अपहार करणे सोडत नाही, हेच यावरून सिद्ध होते. ‘टेन्ट’चे भाडे पाच लाख रुपये !महारोजगार मेळाव्यासाठी अकोला येथील टेन्ट मागविण्यात आले होते. त्याकरिता पाच लाख रुपये भाडे देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, शासन निर्णयानुसार तीन लाखांवरील खर्चासाठी निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. मात्र, येथील कौशल्य विकास विभागाने नियम गुंडाळून निविदांविनाच टेन्ट उभारणीचे कंत्राट सोपविल्याची माहिती आहे.महारोजगार मेळाव्यात ७ ते ८ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. आयोजनात काही त्रुटी असल्याने गोंधळ उडाला. मात्र, पुणे, मुंबईच्या कंपन्यांमध्ये सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांना रोजगार देता आला. मेळाव्याच्या आयोजनासाठी १४ लाखांचे अंदाजपत्रक होते. परंतु प्राप्त ६ लाखांमधून खर्चाची देयके अदा करण्यात आली आहेत. ८ लाख रुपयांबाबत काहीही माहिती नाही.- महेश देशपांडे,सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता अमरावती.