शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीचा चेतन सांभाळणार जम्मू काश्मीरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:22 IST

जम्मू काश्मिरच्या सीमेवर शत्रूंसमोर छाती ताणून उभे राहण्याचे प्रत्येक जवानाचे स्वप्न असते,

ठळक मुद्देयशप्राप्ती : फिजिओथेरपिस्ट झाला आर्मी कॅप्टन

वीरेंद्रकुमार जोगी ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जम्मू काश्मिरच्या सीमेवर शत्रूंसमोर छाती ताणून उभे राहण्याचे प्रत्येक जवानाचे स्वप्न असते, असे स्वप्न साकारण्याची संधी अमरावती जिल्ह्यातील चेतन शेलोटकर या सीआरपीएफच्या जवानाला मिळाली आहे. नुकतीच चेतनची अटॅचमेंट जम्मू काश्मिर, गुलमर्ग येथे ८ मराठा लाईट इन्फ्रंट्रीमध्ये कॅप्टनपदी करण्यात आली आहे.राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरूकुंज मोझरी येथील चेतन शेलोटकर याने फिजिओथेरपी अभ्यासक्रम पूर्ण के ला. डॉक्टर म्हणून समाजात प्रथितयश नाव मिळवित असताना त्याचे मन काही रमत नव्हते. देशासाठी आपण काहीतरी करावे, ही त्याची तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. चेतनने यूपीएससीची परीक्षा दिली. यशही मिळविले अन् त्याचे पोस्टींग २०१३ साली केंद्रीय रिझर्व पोलीस दलामध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून झाले. एक वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे कमांडो कोर्स पूर्ण केला आणि पहिलीच पोस्टींग नक्षलग्रस्त भाग असलेल्या झारखंड येथील लातेहार येथे झाली. येथे आपली जबाबदारी अतिशय चोख पणे चेतनने बजावली. त्याच्या कतृत्वाची व देशप्रेमाची पावती म्हणूनच त्याला भारतीय सैन्याने मराठा लाईट इंफ्रंटीमध्ये कॅप्टनपद देऊ केले आहे. चेतन याला अ‍ॅटचमेंट केल्याचे पत्र नुकतेच मिळाले असून तो येत्या २५ आॅगस्टपासून आपला कार्यभार स्वीकारणार आहे. विशेष म्हणजे, इंडियन मिलिट्री अकादमीमधून सैन्यात प्रवेश घेणाºया अधिकाºयांना ही पोस्टिंग दिली जाते. चेतनला सामाजिक विषयावर लिखानाची आवड आहे. चेतनचे यांचे वडील उदाराम शेलोटकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक तर आई गृहीणी व पत्नी खासगी नोकरीत आहे.मला मिळालेली संधी प्रत्येक तरूणाला मिळू शकते, यासाठी केवळ इच्छाशक्ती असावी लागते. कठोर परिश्रम व देशप्रेमाची भावना मनात असेल तर सर्व सहज शक्य होते.- चेतन शेलोटकर,