शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भातकुली तहसील स्थानांतरणाचा मुद्दा तापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

भातकुली तहसील कार्यालय हे सध्या अमरावतीत आहे. ते भातकुलीत स्थानांतरणासाठी आमदार रवी राणा यांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबरला नोटीफिकेशन आदेशावर स्वाक्षरी केली व प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना आदेश देऊन तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरित करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे धाव : राजकीय पक्षकार्यकर्त्यांचा हस्तक्षेप, काँग्रेसचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील भातकुली तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरण करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी २७ नोव्हेंबर रोजी काढले. त्यानुसार २८ नोव्हेंबर रोजी प्रक्रिया सुरू झाली. परंतु तहसील कार्यालयातील शासकीय दस्तऐवजांची फेकाफेक करीत साहित्य उचलण्यास काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सुरूवात केली. या प्रकारावर भातकुली तालुका काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी तीव्र आक्षेप दर्शविला. याबाबत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गुरूवारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकंदर खॉ पठाण व सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदनातून केली.भातकुली तहसील कार्यालय हे सध्या अमरावतीत आहे. ते भातकुलीत स्थानांतरणासाठी आमदार रवी राणा यांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबरला नोटीफिकेशन आदेशावर स्वाक्षरी केली व प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना आदेश देऊन तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी नवाल यांनी २७ नोव्हेंबर रोजी त्याबाबत योग्य कार्यवाहीचे निर्देश तहसीलदार भातकुली यांना दिले. त्यानुसार तहसील कार्यालय भातकुली येथे स्थानांतरित करण्याची प्रक्रिया २८ नोव्हेंबर रोजी सुरू केली. यावेळी युवा स्वाभिमान व भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तहसीलमधील शासकीय दस्तऐवज उचलून वाहनात टाकले. साहित्यांची फेकाफेक केली, असा आरोप काँग्रेस, शिवसेना पदाधिकाºयांनी केला आहे. त्यामुळे शासकीय दस्तऐवज जबाबदारीने शासकीय कर्मचाºयांकडूनच हलविणे योग्य आहे. परंतु राजकीय पक्षाचे कार्यकर्ते साहित्य उचलण्याच्या कामात हस्तक्षेप करणे योग्य नसल्याने यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर तक्रारीवरून दोषीवर कारवाई करावी व भातकुली तहसील कार्यालय स्थलांतरित करू नये, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकंदर खॉ पठाण, शिवसेनेचे कैलास औघड, धनश्याम कुचे, सुनील जुनघरे, मोबीन, हफीज जादेव, दिनेश वंजारी, संजय कोलटके व नगरिकांनी केली आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार