नरसम्मा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST2021-03-04T04:23:09+5:302021-03-04T04:23:09+5:30

रसायनशास्त्र विभाग व असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यासाठी थायलंड, ...

International webinar at Narasamma College | नरसम्मा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वेबिनार

नरसम्मा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वेबिनार

रसायनशास्त्र विभाग व असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यासाठी थायलंड, फिलिपाईन्स, चीन, नायजेरिया, टांझानिया, ओमान, इंडोनेशिया, लिबिया, मलेशिया, युनायटेड अरब इमिरात, पाकिस्तान, रोमानिया, अल्बानिया, श्रीलंका, टूनशिया, म्यानमार, अफगाणिस्तान, नेपाल, साउथ आफ्रिका, बांग्लादेश, उझबेकिस्तान, ईजिप्त, मेक्सिको, इथिओपिया व सौदी अरेबिया अशाप्रकारच्या २७ देशांतील तसेच देशातील विविध राज्यांतील एकूण ३५०० पेक्षा अधिक संशोधक, विद्वान, संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी यामध्ये सहभाग नोंदविला. झूम व यु-टूबवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे अध्यक्ष संस्थेचे सचिव रामजी महाजन, उद्घाटक असोसियेशन ऑफ केमिस्ट्री टीचर, मुंबईचे अध्यक्ष ब्रिजेश परे हे होते. वेबिनारसाठी वक्ते म्हणून न्यू युनिव्हर्सिटी ऑफ लिस्बोनच्या सोनिया ए. सी. क्याराबिनेरो, ब्रिजेश परे, वासुदेव गुरनुले हे होते. स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीने प्रकाशित केलेल्या जगातील सर्वाधिक

नामांकित वैज्ञानिकच्या यादीत वक्ते सोनिया ए. सी. क्याराबिनेरो, पोर्तुगाल यांचा समावेश आहे. वेबिनारला प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य राजेश चंदनपाट, रसायनशास्त्र विभागप्रमुख श्रीकांत बन्सोड, आतीश मालधुरे, व समन्वयक महेंद्रसिंह पवार हे उपस्थित होते.

या आंतरराष्ट्रीय वेबिनारला महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य

लाभले.

Web Title: International webinar at Narasamma College