शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय 'सट्टा' सोयाबीन घसरले !

By admin | Updated: February 20, 2015 00:09 IST

खरीप २०१४ चे ९० टक्के पेरणीक्षेत्र असणाऱ्या सोयाबीन व कापसाला यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याने मोठा फटका बसला आहे.

लोकमत विशेषगजानन मोहोड अमरावतीखरीप २०१४ चे ९० टक्के पेरणीक्षेत्र असणाऱ्या सोयाबीन व कापसाला यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याने मोठा फटका बसला आहे. सोने, चांदीसह कापूस व सोयाबीन हे एनसीडीईएक्स (नॅशनल कमोडीटी डेरीव्हेशन एक्सचेंज लिमीटेड) मध्ये समाविष्ट आहे. मात्र तुरीचा यामध्ये समावेश नसल्याने या आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम झालेला नाही. त्यामुळे तुरीच्या भावात वाढ होत आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.जिल्ह्यात दररोज सकाळी ११.३० वाजतादरम्यान एनसीडीईएक्सचे दर (व्यापाऱ्यांच्या भाषेत डबा) उघडतात व त्यानुसार शेतमालाचे भाव ठरविण्यात येऊन बाजार समितीमध्ये मालाची खरेदी प्रक्रिया सुरू होते. यावर्षी ब्राझील, अर्जेंटीना व अमेरिका या देशात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाल्यामुळे भारताचा सर्वात मोठा ग्राहक देश असलेल्या चीनकडून मागणी कमी झाली. आंतरराष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत भारताचे उत्पादन हे ५ ते ७ टक्क्यांनी कमी असल्याचा परिणाम निर्यातीवर झाला व याचा थेट परिणाम होऊन सोयाबीनचे भाव यंदा पडले आहे. सोयाबीनप्रमाणे कापसासाठी देखील चीन मोठा ग्राहक आहे. मात्र आॅस्ट्रेलिया व अमेरिकेत कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. त्याचप्रमाणे चीनमध्येदेखील कापूस उत्पादन अधिक झाले. भारतातून दरवर्षी दीड कोटी कापसाच्या गाठी निर्यात केल्या जातात. यंदा ५० लाख गाठीची निर्यात अद्यापपर्यंत झालेली नाही. यंदा भारतामध्ये ४ कोटी ५० लाख गाठी तयार करण्यात आल्या. देशातील सूतगिरणीद्वारा साधारणपणे ३ कोटी १५ लाख गाठींची खरेदी करण्यात येते. उर्वरित १ कोटीवर गाठींना मागणी नाही. मागील वर्षीच्या २५ ते ३० लाख कापसाच्या गाठी निर्यातीअभावी अद्याप शिल्लक आहेत. यामुळे कापसाचे दर हमीभावाच्या आत असल्याची माहिती अमरावती बाजार समितीचे अडते, व्यापारी अमर बांबल यांनी दिली. मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस व सोंगणी, मळणीच्या काळात परतीचा पाऊस व गारपीट यामुळे सोयाबीन उत्पादनात कमी होऊन सोयाबीन डागी झाले. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असल्यामुळे एफएक्यू ग्रेडच्या सोयाबीनला चार हजारांवर भाव मिळाला. यंदा सोयाबीनचे दर ३००० ते ३२०० रूपये प्रतिक्विंटल दरम्यान स्थिरावले आहे. कापसाच्या हमीभावात ४ हजार ५० रुपये असताना ग्रामीण भागात तर ३५०० रूपये क्विंटलने कापसाची खरेदी होत आहे. जिल्ह्यात खरीप २०१४ मध्ये ६ लाख ७९ हजार ९९० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. यापैकी ३ लाख १९ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन व १ लाख ९४ हजार ३५२ हेक्टर क्षेत्रात कपासीची पेरणी झाली आहे. एकूण पेरणीक्षेत्राच्या ९० टक्के हे पेरणीक्षेत्र आहे. या हंगामात पेरणीपासून उशिरा पाऊस व नंतर खंड यामुळे सोयाबीन उत्पादनात ७० ते ७५ टक्क््यांनी कमी झाली. जिल्हा दुष्काळग्रस्त आहे. उत्पादन कमी असताना मागणी कमी असल्यामुळे सोयाबीन व कापसाचे भाव पडले. याचा फार मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.