शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

अंतरगाववासीयांनी नाकारले मतदान !

By admin | Updated: February 22, 2017 00:18 IST

लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे २५ वर्षांपासून गावचा विकास रखडल्याच्या निषेधार्थ मतदान न करण्याच्या निर्णयावर अंतरगाववासी मतदानाच्या दिवशीही ठाम राहिले.

गावकऱ्यांनी पाळला निर्धार : प्रशासनाची मध्यस्थी अयशस्वी येवदा : लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे २५ वर्षांपासून गावचा विकास रखडल्याच्या निषेधार्थ मतदान न करण्याच्या निर्णयावर अंतरगाववासी मतदानाच्या दिवशीही ठाम राहिले. निवडणुकीत मतदान न करण्याच्या निर्णयामुळे हे गाव प्रकाशझोतात आले होते. दरम्यान गावकऱ्यांनी उमेदवारांच्या प्रचारवाहनांना गावबंदी करून रोष व्यक्त केला. गावकऱ्यांनी मंगळवारी मतदान न करण्याचा निर्धार कायम ठेवला. तीन ते चार शासकीय कर्मचारी वगळता कोणीही गावकरी मतदानासाठी बाहेर पडले नाहीत.दर्यापूर तालुक्यातील अंतरगाव शिवाजी या गावाची लोकसंख्या १ हजाराचे वर असून येथे ५६४ मतदार आहेत. गावाची सद्यस्थिती अत्यंत वाईट असून मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. वारंवार मागण्या करून कंटाळलेल्या गावकऱ्यांनी यंदाच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्धार केला होता. येथील मतदान केंद्राला सहायक निवडणूक निरीक्षक सुनील पाटील यांनी भेट दिली असता एकही गावकरी मतदानासाठी पोहोचला नसल्याचे चित्र दिसून आले. (वार्ताहर)शासकीय कर्मचाऱ्यांवर मतदानाची सक्ती झोनल अधिकारी अरविंद गुडधे व नायब तहसीलदार एम.डी.चव्हाण यांनी येथील अंगणवाडी सेविका व मदतनिस तसेच गावचे पोलीस पाटील जयंत कथलकर यांना नोकरीवरून कमी करण्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून मतदान करवून घेतल्याचा आरोप या तिघांनी केला आहे. ओळखपत्र आणण्याची सवड न देताच मतदान प्रक्रिया उरकण्यात आली, असे त्यांचे म्हणणे आहे. निवडणूक केंद्रावरील व्यक्तिने आम्हाला बोलावून नेले. बीडीओंनी ‘तु्म्हाला नोकरी करायची नाही का’ असा धाक दाखवून दमदाटी करून मतदान करण्यास बाध्य केले. माझ्या मदतनिसालासुद्धा असाच धाक दाखवला. - सविता कथलकर,अंगणवाडी सेविका, अंतरगाव पोलीस पाटील म्हणून मी मतदान केंद्रावर उपस्थित होतो. निवडणूक केंद्राला भेट देण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने माझ्याकडून मतदान करवून घेतले. ओळखपत्र आणण्याची सवडही दिली नाही. -जयंत कथलकर,पोलीस पाटील, अंतरगाव