शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

स्टीम सप्ताहाची घरोघर अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना साथीचे संक्रमण रोखण्यासाठी कोविड सुसंगत जीवनशैली प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे झाले आहे. यासोबतच नियमितपणे वाफ ...

अमरावती : कोरोना साथीचे संक्रमण रोखण्यासाठी कोविड सुसंगत जीवनशैली प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे झाले आहे. यासोबतच नियमितपणे वाफ घेतल्यास कोरोनाचा विषाणू शरीरातून दूर होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांच्या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे स्टीम सप्ताहाची घरोघर अंमलबजावणी व्हावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, नेहमी हात स्वच्छ धुणे या कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करतानाच, चांगला सकस आहार, कोविड सुसंगत जीवनशैली, नियमित वाफ घेणे आदींचाही अवलंब प्रत्येकाने केला पाहिजे. त्याबाबत जनजागृतीसाठी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून स्टीम सप्ताह २६ एप्रिल ते २ मे दरम्यान राबविण्यात येत आहे. या कालावधीत व त्यानंतरही सर्वांनी वाफ घेऊन स्टीम सप्ताह यशस्वी करावा. प्रत्येक घरातून साथीचा कायमचा समूळ नायनाट करण्याचा प्रयत्न ‘स्टीम सप्ताह’ राबवून करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सर्व तालुका प्रशासनांकडूनही विविध गावांमध्ये सप्ताहानिमित्त उपक्रम राबविण्यात येत आहेत. ऑनलाईन व्यासपीठांचा वापर करूनही सप्ताहाबाबत जनजागृतीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.