शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

संत गजानन महाराजांची प्रतिमा हटविली

By admin | Updated: August 27, 2016 00:03 IST

राजकमल चौकातील ऐतिहासिक श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांचा खापर्डेवाडा पाडण्याचा घाट काही विघ्नसंतोषी लोकांकडून रचला जात आहे.

खापर्डेवाड्यातील प्रकार : रोज पाडली जाते वाड्याची भिंत, भक्तांमध्ये नाराजीसंदीप मानकर अमरावतीराजकमल चौकातील ऐतिहासिक श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांचा खापर्डेवाडा पाडण्याचा घाट काही विघ्नसंतोषी लोकांकडून रचला जात आहे. बुधवारी अज्ञाताने या वाड्यातील काही साहित्य काढून नेले. समाजकंटक इतक्यावरच थांबले नसून वाड्यातील ज्याठिकाणी साक्षात गजानन महाराज बसले होते, त्या चौथऱ्यावर भक्तांद्वारे विधिवत प्रतिष्ठापित श्रींची प्रतिमा हटविण्याचा प्रतापही त्यांनी केला आहे. ही बाब भाविकांच्या लक्षात येताच श्रींच्या भक्तांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गुरूवारी काही भक्त येथे पूजा करण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. यापूर्वी येथील औदुंबराचे झाड अमानुषपणे तोडण्यात आले. परंतु येथे शेगावनिवासी संत गजानन महाराजांनी वास्तव्य केल्यामुळे येथे भक्तांचा राबता असतो. परंतु कंत्राटदाराच्या आदेशानुसारच येथून महाराजांची प्रतिमा काढल्याचा संशय श्रींच्या भक्तांनी व्यक्त केला आहे. हा वाडा खासगी कंत्राटदाराने विकत घेतल्याची माहिती आहे. या कंत्राटदारानेच या वाड्यात प्रवेशबंदीचे फलक लावले आहेत. तरीही येथे येऊन भाविक येथील चौथऱ्यावर स्थापित संत गजानन महाराजांच्या प्रतिमेची दर गुरूवारी पूजा-अर्चना करीत होते. पण, काही विघ्नसंतोषी लोकांना ते आवडले नाही. याठिकाणी संत गजानन महाराजांचे मंदिर व्हावे, अशी अनेक दिवसांपासून श्रींच्या भक्तांची मागणी आहे. या वाड्याला ऐतिहासिक महत्त्व असून ख्यातनाम वकील दादासाहेब खापर्डे हयात असताना येथूनच अनेक देशभक्तांच्या चळवळी झाल्या आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक वाड्याचे जतन व्हावे, अशी भाविकांची व अंबानगरीतील नागरिकांची मागणी आहे. वाडा पाडण्याचा घाटयेथील ऐतिहासिक इमारत थोडी-थोडी रोज पाडली जात आहे. याकडे पोलिसांचे व महापालिकेचे दुर्लक्ष असून अंबानगरीतील हा ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा की नाही? यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु हा वाडा एका कंत्राटदाराने दादासाहेबांच्या नातवांकडून खरेदी केल्याचे समजते. त्यामुळे वाड्याच्या परिसरात नागरिाकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून तसे फलकही लावण्यात आले आहेत.वाडा सुस्थितीत असतानाही शिकस्त दाखविण्याचा प्रयत्न ?हा वाडा सध्याही सुस्थितीत आहे. वाड्याच्या मागच्या भिंतीचे अवलोकन केल्यास इमारतीचे बांधकाम किती मजबूत आहे, हे लक्षात येते. खुद्द कंत्राटदाराकडूनच ही इमारत जीर्ण झाल्याचे दाखविले जात आहे. महापालिकेने ही इमारत क्षतिग्रस्त आहे की नाही, याची पाहणी करण्याची जबाबदारी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे दिली होती. पण, राजकीय दबावात येऊन येथील प्राचार्यांनी महापालिकेला चुकीचा अहवाल सादर केल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. हे प्रकरण थंडबस्त्यात पडले. संत गजानन महाराज हे केवळ वैदर्भीयांचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो जनांचे आराध्य आहेत. त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक मंदिरात भक्तांचा सतत राबता असतो. मात्र, ज्याठिकाणी महाराजांचा पदस्पर्श झाला, जेथे महाराजांनी काही काळ विश्राम केला, त्याठिकाणी त्यांची प्रतिमादेखील सुरक्षित राहू शकत नाही, याबाबत भक्तांनी प्रचंड खेद व्यक्त केला आहे. औदुंबराचे झाडही तोडले?भक्तांच्या अनेक आठवणी या वाड्याशी जुळलेल्या आहेत. याठिकाणी ऐतिहासिक औदुंबराचे झाड होते. हे झाडसुद्धा विघ्नसंतोषी लोकांनी तोडून टाकले. येथे जुनी विहीर आहे. झाडाजवळच्या चौथऱ्यावर संत गजानन महाराज बसले होते. त्यामुळे या जागेला आध्यात्मिक महत्त्व आहे.