शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील पुसली धरणात शेकडो मासे मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 08:18 IST

Amravati news वरूड-शेंदूरजनाघाट येथून जवळच असलेल्या पुसली प्रकल्पातील शेकडो मासे मृतावस्थेत किनाऱ्यावर आले आहेत. ते मासे कशामुळे दगावले, याचे कारण अद्यापही कळू शकले नाही.

ठळक मुद्देशेंदूरजनाघाटचा पाणीपुरवठा बंद

 लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : वरूड-शेंदूरजनाघाट येथून जवळच असलेल्या पुसली प्रकल्पातील शेकडो मासे मृतावस्थेत किनाऱ्यावर आले आहेत. ते मासे कशामुळे दगावले, याचे कारण अद्यापही कळू शकले नाही. प्रकल्पाच्या पाण्याचे नमुने अमरावतीच्या प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. अहवाल येईपर्यंत तेथील पाण्याचा पिण्यासाठी होणारा वापर बंद करण्यात आला आहे.

            तालुक्यातील पुसली प्रकल्प परिसरात अचानक शेकडो मासे मरून पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत मासे प्रकल्पाच्या काठावर येत आहेत. ही माहिती मिळताच शेंदूरजनाघाट नगर परिषदेचे काही नगरसेवक व पाणीपुरवठा अभियंत्यांनी लगेच प्रकल्पाची पाहणी केली व शेंदूरजनाघाटला होत असलेला पाणीपुरवठा थांबविला. फिल्टर प्लांट साफ करण्याचे निर्देेशदेखील दिले. शेंदूरजनाघाट नगर परिषदेला पुसली प्रकल्पातूनच पाणीपुरवठा होत असल्याने सध्या पाणीपुरवठा बंद केला असून, चौकशी सुरू आहे. तेव्हा मासे कशामुळे मरण पावले, याचे नेमके कारण काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुसली धरणावरील पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने नागठाणा धरण, जामतळा येथील विहीर तसेच बोअरने पाणीपुरवठा सुरू आहे.

पुसली धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तेथील पाण्याचे नमुने तपासणीकरिता अमरावतीला पाठविले आहेत. अद्याप अहवाल अप्राप्त आहे.

- रश्मी बारस्कर, पाणीपुरवठा अभियंता, नगर परिषद, शेंदूरजनाघाट

टॅग्स :Damधरण