शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 06:00 AM2019-11-30T06:00:00+5:302019-11-30T06:00:41+5:30

सजावटीसाठी येणाºया कार मुख्य रस्त्यावर उभ्या केल्या जातात. कारचे सर्व पाचही दरवाजे उघडल्यामुळे एकाच कारसाठी मोठी जागा व्यापली जाते. अनेक कार एकाच वेळी उभ्या असताना अवघा परिसरच गिळंकृत होतो. कार सजावट करणारे कर्मचारी रस्त्यावर खुर्च्या ठेवून बसतात. मोठे फलक रस्त्यावर ठेवले जाते.

Hundreds of citizens are at risk | शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात

शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात

Next
ठळक मुद्देकार सजावट व्यवसाय रस्त्यावर : पोलिसांचे बळ मात्र नियमबाह्य कामांना !

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विभागीय क्रीडा संकुल आणि परिसरात कार सजावटीची अनेक दुकाने थाटण्यात आली आहेत. मोर्शी रोडचा वापर गृहीत धरूनच हे व्यवसाय या परिसरात सुरू करण्यात आलेत. त्यामुळे संकुल परिसरातील मुख्य रस्त्याचा अर्धाअधिक भाग कायम व्यापलेला असतो. या रस्त्यांवर अपघात ही नित्याचीच बाब ठरली आहे. नियमबाह्य व्यावसायिकांना बळ देणाऱ्या पोलिसांनी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे.
सजावटीसाठी येणाऱ्या कार मुख्य रस्त्यावर उभ्या केल्या जातात. कारचे सर्व पाचही दरवाजे उघडल्यामुळे एकाच कारसाठी मोठी जागा व्यापली जाते. अनेक कार एकाच वेळी उभ्या असताना अवघा परिसरच गिळंकृत होतो. कार सजावट करणारे कर्मचारी रस्त्यावर खुर्च्या ठेवून बसतात. मोठे फलक रस्त्यावर ठेवले जाते. सजावटीदरम्यान कारमधील सीट काढून रस्त्यावर ठेवल्या जातात. कर्मचारी आणि कारसोबत आलेल्यांचा रस्त्यावरील वावर जणू पटांगणात फिरावे असाच असतो. दुकानांत येणाऱ्या बहुतांश कार विरुद्ध दिशेने आणल्या जातात. त्या तशाच ' राँग साइड' स्थितीत रस्त्यावर उभ्या ठेवून त्यांची सजावट केली जाते. कार मागे-पुढे करताना मुख्य रस्त्यावरील वर्दळीचे जराही भान ठेवले जात नाही. अत्यंत वर्दळीचा हा मुख्य रस्ता चक्क खासगी मालमत्तेप्रमाणे राजरोसपणे वापरला जातो. मोजक्या व्यावसायिकांच्या आर्थिक लाभासाठी शेकडो, हजारो नागरिकांचे जीव पोलीस धोक्यात घालत असल्याच्या भावनेने सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या मुख्य रस्त्यावर उड्डाणपुलावरील वाहने उतरत असल्यामुळे भरधाव येणाऱ्या वाहनांना नेहमीच व्यापलेल्या रस्त्याचा अडथळा होतो. त्यामुळे अनेक अपघात घडतात. सदर परिसरात महाविद्यालये, क्रीडा संकुल असल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा वावर असतो. त्यांनाही या स्थितीमुळे अपघातांचा सामना करावा लागतो.
पोलिसांचीही वाहने सजावटीला
अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यां कार सजावटीच्या नियमबाह्य मुद्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांची खासगी वाहने या दुकानांमध्ये सजावटीसाठी नेली जातात.

अधिकारी कुणासाठी?
सार्वजनिक उपयोगासाठी असलेल्या, वाहने चालविण्यासाठी असलेल्या रस्त्यांचा कुणी खुलेआम व्यावसायिक वापर करीत असेल, कायद्याला वाकुल्या दाखवित असेल तरीही पोलिस गप्प राहत असतील, महापालिका दुर्लक्ष करीत असेल आणि क्रीडा अधिकारी हात वर करीत असतील, तर हे अधिकारी कुणाचे? त्या नियमबाह्य व्यावसायिकांचे की सामान्यांचे? प्रशासनाचे कर्तव्य काय? नागरिकांचे संरक्षण की नियमबाह्य व्यावसायिकांचे रक्षण, असे प्रश्न सामान्यजनांना अस्वस्थ करतात.

Web Title: Hundreds of citizens are at risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार