शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

नझूलच्या जागेवर दारु दुकानाला परवानगी कशी?

By admin | Updated: December 18, 2014 00:11 IST

वडाळी येथील देशी दारू विक्रीचे दुकान हद्दपार करण्यासाठी महिलाशक्ती एकवटली आहे. शासनाच्या दारु विक्रीबाबतच्या धोरणाची चिरफाड करण्यासाठी ...

अमरावती : वडाळी येथील देशी दारू विक्रीचे दुकान हद्दपार करण्यासाठी महिलाशक्ती एकवटली आहे. शासनाच्या दारु विक्रीबाबतच्या धोरणाची चिरफाड करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्याची या रणरागिणींची तयारी आहे. मात्र, ज्या दारु विक्रीच्या दुकानाबाबत वाद उफाळला आहे, ते दुकान नझुलच्या जागेवर असून चालविण्याचा परवाना मिळाला कसा? हा खरा सवाल आहे.
मागील १० महिन्यांपासून वडाळीतील देशी दारु विक्रीचे दुकान प्रशासनाच्या आदेशाने बंद आहे. हे दुकान वडाळीत नकोच, ही भूमिका या परिसरातील महिलांची आहे. मात्र नियमानुसार हे दुकान दुसरीकडे स्थलांतरित करायचे असल्यास मतदान प्रक्रिया राबवूनच प्रशासनाला निर्णय घ्यावा लागतो. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. मतदार यादीत घोळ असल्यामुळे ही प्रक्रिया थांबवून महिलांनी महापालिका, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत मतदान नकोच ही भूमिका घेतली. अखेर जिल्हा प्रशासनाला यात मध्यस्ती करावी लागली. पुढील आदेशापर्यंत दारु विक्रीचे दुकान बंद करण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करावा लागला. परंतु कालांतराने दारु विक्रेत्यांनी दुकानाविषयी उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेनुसार न्याय मागितला. त्यामुळे उच्च न्यायालयाने प्रशासनाला योग्य कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन २८ डिसेंबर रोजी देशी दारु विक्रीच्या दुकानासंदर्भात मतदान घेण्याचे सांगितले. मात्र पुन्हा मतदान होणार असल्याने वडाळीतील महिलांचा राग अनावर झाला. त्यानंतर एक्साईज, जिल्हाकचेरीवर धाव घेत या दुकानासंदर्भात मतदान घेतल्यास कायदा हातात घेऊ, असा इशारा दिला. देशी दारुच्या दुकानावरुन प्रक्षोभ उफाळून येत असताना हे दुकान खरेच वडाळीतील चालविणे योग्य आहे का? याविषयी जिल्हाप्रशासनाने गुप्त अहवाल मागविणे आवश्यक आहे. ज्या तीव्रतेने महिलांनी या दारु दुकानाविषयी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढ्यात गाऱ्हाणी मांडल्यात ते दुकान कोणाच्या मालकीचे? ती जागा कोणाच्या मालकीची? या खोलात शिरल्यास हे दुकान हटविण्यासाठी मतदान घेण्याची गरज पडणार नाही, हे वास्तव आहे. वडाळी व देवीनगर हा संपूर्ण भाग हा नझुलमध्ये आहे. या जागेवर दारु विक्रीचा परवाना देता येतो काय? याचा शोध जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तर न्यायालयाच्या आदेशापूर्वीच जिल्हाधिकारी किरण गित्ते हे नझुलच्या जागेवरील हे दारुविक्रीचे दुकान सहजतेने अतिक्रमणाच्या नावाखाली भुईसपाट करु शकतात, हे कोणालाही विचारण्याची गरज नाही, हे खरे आहे. वडाळी, देवीनगरचा भाग हा स्लम म्हणून महापालिकेने घोषित केला आहे. २७ वर्षांपूर्वी ज्या मालमत्ताधारकाच्या नावाने हे दारु विक्रीचे दुकान सुरु करण्यात आले. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. मात्र दरवर्षी राज्य उत्पादन शुल्क विभाग ज्या नियमांना अनुसरुन दारु विक्री परवान्याचे नूतनीकरण करतात, त्यानुसार वडाळीतील हे देशी दारु विक्रीचे दुकान अस्तित्वात आहे काय? याचे चिंतनही जिल्हाधिकाऱ्यांनी करावे; तथापि उच्च न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा मतदान झाले तर महिलांचे दारुबंदीसाठीचे आंदोलन कोणते वळण घेईल, ही वेळच सांगेल, या निर्णयाप्रत आंदोलक पोहचले आहेत.