उच्चांक; ६० संक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:01:08+5:30

सायंकाळच्या अहवालात विधान परिषदेच्या एका आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यांना बरे न वाटल्याने शनिवारी सकाळी पीडीएमसीमध्ये रॅपिड अँटिजन टेस्ट केली. अहवाल पॉझिटिव्ह आला. महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, ते एक दिवसांपूर्वीच मुंबईहून परतले. त्यांच्यावर सध्या नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुटुंबातील पाच व्यक्तींचे स्वॅब घेतले गेले.

Highs; 60 infected | उच्चांक; ६० संक्रमित

उच्चांक; ६० संक्रमित

Next
ठळक मुद्देएकूण ८५५ । रोज सरासरी नऊ व्यक्ती पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शनिवारी एका आमदारासह ६० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी आढळलेल्या संक्रमितांची ही संख्या उच्चांक आहे.
पहिल्या टप्प्यात प्राप्त अहवालानुसार, अकोला जिल्ह्यातील अकोट येथील १२ वर्षीय मुलगी, १७ वर्षीय युवक, २२ वर्षीय तरुणीसह ४५ वर्षीय महिला, मांगीलाल प्लॉट येथील ५३ वर्षीय पुरुष व ४८ वर्षीय महिला, कृष्णनगरातील ३६ वर्षीय पुरुष, सिद्धेश्वर सोसायटीमधील ७८ वर्षीय वृद्ध, राजापेठच्या बजरंग टेकडी येथील ६३ वर्षीय महिला, शेगाव नाका येथे ३८ वर्षीय महिला व ६५ वर्षीय पुरुष, बडनेराच्या जुन्या वस्तीत ३६ वर्षीय महिला व ४२ वर्षीय पुरुष, शेगाव नाका येथील १२ वर्षीय बालक, कांतानगरात २ वर्षीय बालकासह ३६ वर्षीय महिला व ४० वर्षीय पुरुष, अशोकनगरात २५ वर्षीय तरुण, २७ वर्षीय महिला व ७० वर्षीय वृद्ध, याशिवाय जिल्हा ग्रामीणमध्ये सातरगाव येथील ३० वर्षीय महिला व परतवाड्याच्या सायमा कॉलनीत १४, १६ व २० वर्षीय तरुण व २१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दुपारच्या अहवालात बडनेराच्या पवननगरात २५ वर्षीय महिला, रेल्वे क्वार्टर येथील २९ वर्षीय पुरुष, माताफैल येथील २८ व ३३ वर्षीय महिला तसेच कॅम्प येथील ३२, ५२ व ८१ वर्षीय पुरुष व ६० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सायंकाळच्या अहवालात बालाजी मंदिर परिसरातील ६८ वर्षीय महिला, नवसारीचा ३३ वर्षीय, कंवरनगरातील ५० वर्षीय, रोषणनगरातील ५५ वर्षीय, गजानननगरातील ३७ वर्षीय , सातुर्णा येथील ३० वर्षीय, सुभाष कॉलनीतील ५५ वर्षीय, विजय कॉलनीतील ५० वर्षीय, हमालपुऱ्यातील २६ वर्षीय, तळेगाव येथील ५३ वर्षीय, चांदूर येथील ३५ वर्षीय, कारंजा येथील ८० वर्षीय पुरुष व दर्यापूर तालुक्यात शिंगणापूर येथील २८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
रात्रीच्या अहवालात पॅराडाईज कॉलनीत ४० वर्षीय, राहुलनगरात ५३ वर्षीय, जवाहर गेट येथे ७० वर्षीय महिला, उत्तमनगर येथे २२ वर्षीय, राहुलनगरात ३६ वर्षीय, राजापेठ बजरंग टेकडी येथे ३८ वर्षीय, नंदनवन कॉलनीत ४६ वर्षीय, सिव्हिल लाईन येथे ४७ वर्षीय, यशोदानगर नं-२ मध्ये ५४ वर्षीय, सातुर्णा गावंडे लेआऊट येथे ५९ वर्षीय, पुरुष, गगलानीनगरात १५ वर्षीय तरुणी, पिंप्री येथे ५० वर्षीय पुरुष व जिल्हा ग्रामीणमध्ये धामणगाव येथे ५० वर्षीय व दर्यापूर तालुक्यात टाकळी येथे ४० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

आमदार पॉझिटिव्ह
सायंकाळच्या अहवालात विधान परिषदेच्या एका आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यांना बरे न वाटल्याने शनिवारी सकाळी पीडीएमसीमध्ये रॅपिड अँटिजन टेस्ट केली. अहवाल पॉझिटिव्ह आला. महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, ते एक दिवसांपूर्वीच मुंबईहून परतले. त्यांच्यावर सध्या नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुटुंबातील पाच व्यक्तींचे स्वॅब घेतले गेले.

Web Title: Highs; 60 infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.