शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांचा जुगार अड्ड्यावर छापा

By admin | Updated: October 13, 2016 05:26 IST

शहरात सर्रास जुगाराचे अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्वत: एका मटक्याच्या अड्ड्यावर धाड

अमरावती : शहरात सर्रास जुगाराचे अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्वत: एका मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकून चार आरोपींना पाठलाग करून पकडले. कोणताही सरकारी लवाजमा सोबत न घेता, त्यांनी केलेल्या या कारवाईची जिल्ह्यात खमंग चर्चा सुरू आहे. याची छायाचित्रे तरुणांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर दिवसभर फिरत होती. फेसबुकवर त्याची बरीच चर्चा झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम, खनिकर्म, उद्योग आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे हे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याकडे अनेक सामान्य नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्या आधारे मंगळवारी सायंकाळी त्यांनी स्वत: रवी गुप्ता याच्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. दस्तुरखुद्द पालकमंत्री आल्याचे लक्षात येताच जुगार खेळणारे घाबरले. जागा मिळेल तिकडे पळू लागले, परंतु पालकमंत्र्यांनी पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना घटनास्थळी बोलविण्यात आले. त्यानंतर, संतप्त पालकमंत्र्यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.पोलिसांनी प्रभाकर आकाराम शिरभाते (५१, आदर्शनगर), गजानन बाबाराव शिरभाते (४०,रा. मूर्तिजापूर), बाबू नागोराव सुरकार (३७,रा. विलासनगर) आणि आशिष शंकर निमजे (२९, रा. नागपूर) या चार आरोपींना अटक केली. जुगार अड्ड्याचा मुख्य सूत्रधार रवी गुप्ता हा पसार होण्यात यशस्वी झाला. त्याच्या अटकेचे आदेश पालकमंत्र्यांनी पोलिसांना दिले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सट्टापट्टी, जुगाराचे अन्य साहित्य व ८,७८० रुपये रोख असा एकूण ११,२८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (प्रतिनिधी)