शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा विद्युत अभियंत्याला घेराव

By admin | Updated: September 29, 2014 22:54 IST

नजीकच्या वंडली शेतशिवारात वारंवार कृषिपंपांचा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पिके सुकू लागली आहेत. यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी गाडेगाव उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंत्याला घेराव घालून

राजुराबाजार : नजीकच्या वंडली शेतशिवारात वारंवार कृषिपंपांचा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पिके सुकू लागली आहेत. यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी गाडेगाव उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंत्याला घेराव घालून तातडीने वीज पुरवठा नियमित करण्याची मागणी केली.प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील वंडली शेतशिवारातील कृषिपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. याबाबत वारंवार लेखी तक्रारी देऊनही वीज वितरण कंपनीने दखल घेतली नाही. वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांना कपाशी, मिरची, संत्रा, सोयाबीन आदी पिकांसाठी शेतकऱ्यांना ओलीत करावे लागते. परंतु वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकरी वैतागले आहेत. चार पाच महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होणे ही नित्याची बाब झाली आहे. परिणामी शेती पिकाला पाणी देणे कठीण झाले आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे. यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे गाडेगाव उपकेंद्र गाठून कनिष्ठ अभियंत्याला घेराव घातला व तातडीने वीजपुरवठा नियमित सुरु करण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्यास वीज कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामध्ये वंडली येथील शेतकरी चंद्रशेखर भोकरे, नीलेश इसळ, देवीदास कळसकर, धनराज वानखडे, श्याम चरपे, महादेव भोंडे, गजानन पेठे, साहेबराव वानखडे, योगेश कडू, केशव धामंदे, सुरेंद्र वानखडे, दिनेश बेले, विठ्ठल भोंड, नामदेव ठाकरे, प्रमोद वानखडे, गोपाल इंगळे आदींचा समावेश होता. (वार्ताहर)