शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ७२ आसनी विमानसेवेला ‘ग्रीन सिग्नल’

By admin | Updated: July 3, 2016 23:59 IST

येथील बेलोरा विमानतळाहून ७२ आसनी विमानसेवा सुरू करण्याचे केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

अमरावती : येथील बेलोरा विमानतळाहून ७२ आसनी विमानसेवा सुरू करण्याचे केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे अमरावतीकरांना लवकरच विमान सेवेची संधी मिळणार आहे.केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचा चमुने मे महिन्यात बेलोरा विमानतळाची पाहणी करून येथे विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची चाचपणी केली होती. त्यानुसार चार सदस्यीय चमुने बेलोरा विमानतळाची पाहणी करून ७२ आसनी विमानसेवा (एटीआर) सुरू करण्यास होकार दर्शविला आहे. मात्र, बेलोरा विमानतळाहून विमानाचे ‘टेकआॅफ’ आणि ‘लॅडिंग’ करताना भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता धावपट्टीची लांबी वाढविणे गरजेचे राहील, असे या चमुने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. विमानतळाच्या पश्चिम भागातील सीमेकडील चार हेक्टर जागा संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. विमानतळाचा पाहणीवजा वस्तुनिष्ठ अहवाल एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे आयटीजीएम व्ही.के.मिश्रा, असिस्टंट जीएम एम.पी. अग्रवाल, वास्तुशिल्पकार मार्क एक्का, वरिष्ठ प्रबंधक एन.के.गुप्ता यांनी राज्य शासन आणि महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाला सोपविला आहे. एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी चमुच्या अहवालात बेलोरा विमानतळावर धावपट्टीची लांबी, विजेचे काम, एटीएस टॉवर, ‘रन-वे’वर लाईट, टर्मिनल इमारत, विमानतळ सीमेवर प्रकाश व्यवस्था, जळू ते बेलोरा वळण रस्ता आदी प्रस्तावित विकासकामे त्वरेने सुरूकरण्याचे सुचविले आहे. बेलोरा विमानतळाकडे २८३ हेक्टर जमीन असल्याने विस्तारिकरणात अडचण नाही. त्यामुळे येत्या काळात बेलोरा विमानतळाहून आंतरराज्यीय विमानसेवा सुरू करण्यास हरकत नाही. प्रस्तावित ७२ आसनी विमानसेवा सुरू करण्याचे एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमुने अहवालात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)धावपट्टीचा विस्तार : एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचा राज्य शासनाला अहवालआॅगस्टपासून विमानतळावर कामे सुरू होतीलआॅगस्ट महिन्यापासून बेलोरा विमानतळावर विविध विकासकामांना प्रारंभ होईल, असे संकेत बेलोरा विमानतळाचे प्रबंधक एम.पी.पाठक यांनी दिलेत. बेलोरा विमानतळावर हल्ली १८५० मीटर धावपट्टी असून प्रवासी विमानसेवा सुरु करण्यासाठी किमान २२०० मीटर धावपट्टी तयार केली जाणार आहे. त्यानुसार २२०० मीटर धावपट्टी तयार करण्याचे देखील एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमुने प्रस्तावित केले आहे. विमानतळाहून ७२ आसनी विमान सेवा सुरू करण्यास एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमुने होकार दर्शविला आहे. काही जमीन संपादित केली जाणार आहे. प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचे हे संकेत आहेत.- एम.पी.पाठक, प्रबंधक, बेलोरा विमानतळ