शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

गोवारींच्या सवलतीसाठी सरकारचे सकारात्मक पाऊल

By admin | Updated: August 12, 2015 00:15 IST

आदिवासी असतानाही गत शासनाच्या चुकीच्या धोरणाचे चटके सोसणाऱ्या राज्यातील २४ लाख गोवारींच्या सवलतीबाबत केंद्र ...

गडकरी, फडणवीसांची भूमिका : दिल्लीत होणार बैठकमोहन राऊत अमरावतीआदिवासी असतानाही गत शासनाच्या चुकीच्या धोरणाचे चटके सोसणाऱ्या राज्यातील २४ लाख गोवारींच्या सवलतीबाबत केंद्र व राज्य शासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे़ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देंवेन्द्र फडणवीस यासंदर्भात महत्त्वाची भूमिका घेणार आहेत. दरम्यान आगामी काळात दिल्लीत या संदर्भातील बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़गोवारी ही मुळची आदिवासी जमात १० सप्टेंबर १९५६ रोजी अनुसूचित जमातीत गोवारीऐवजी गोंडगोवारी असा शब्द अंतर्भूत करण्यात आला आणि सर्व गोवारींना २३ एप्रिल १९८५ पर्यंत गोंडगोवारी अशी प्रमाणपत्रे बहाल करण्यात आली़ परंतु २४ एप्रिल १९८५ रोजी काँग्रेस शासनाने एक शासकीय अध्यादेश काढून गोवारींना अनुसूचित जमातीच्या मिळणाऱ्या सवलती काढून घेतल्या़ तेव्हापासून हा समाज आपल्या हक्कासाठी लढा देत आहे़ एकीकडे या आदिवासी गोवारींची दुसरी पिढी सवलतीसाठी संघर्ष करीत गारद झाली तर दुसरीकडे आज पर्यंत या गोवारींच्या सवलती नाकराल्या गेल्या आहे़केंद्र, राज्याचे सकारात्मक पाऊलनागपुरातील गोवारी हत्याकांडाला २२ वर्ष पूर्ण होत असतांना अद्यापही या जमातीला हक्काच्या सवलतीपासून मागील सरकारने वंचित ठेवले आहे़ दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विदर्भातील २४ लाख गोवारींची मते यावेळी भाजपाच्या पारड्यात गोवारी नेत्यांनी टाकली आहे़ गत शहीद गोवारीदिनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी या गोवारी जमातीला त्यांचे हक्क प्राप्त करून देणार असल्याचे सूचक वक्तव्य के ले होते़ यासंदर्भात आता केंद्र व राज्य सरकारने पाऊल उचलले आहे़ गोवारी नेत्यांची या विषयी दिल्लीत बैठक़ आयोजीत करण्यात येणार आहे़सर्व संघटना झाल्या एकत्रमागील तीन तपापासून गोवारी समाजाला सवलत नाकारल्या जात असल्यामुळे नागपूर येथे राज्यातील सर्व गोवारी समाजाच्या संघटना एकत्र झाल्या आहे़ गोवारी नेत्यांनी एकत्र यावे यासाठी या पूर्वीच गोवारी समाजाचे नेते शालीक नेवारे यांनी पुढाकार घेऊन ही बैठक एकत्रित आयोजित केली होती़ गत रविवारी या संदर्भातील बैठक पार पडली. बैठकीला गोवारी समाजाचे नेते देविदास बासकवरे , देग़ो़चचाणे, प्रभू काळसर्पे, नारायण सहारे, कैलास राऊत, दुधकवर गुरूजी, जगन्नाथ ठाकरे, यांच्यासह सर्वच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते़ इतिहासातही गोवारींचा उल्लेखस्वातंत्र्यपूर्वकाळापासून आहे़ १८६९ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या जनगणनेत गोवारी भाषा बोलणाऱ्यांची संख्या २ हजार ५१७ असल्याची नोंद इतिहासात आहे़ मार्टीन यांनी दिलेल्या अहवालात गोवारी ही एक आदिवासी जमात असल्याची नोंद आहे़ रिसेल आणि हिरालाल यांनी लिहलेल्या पुस्तकात आदिवासींच्या नोंदी या जमातीच्या नावाने आहे़ सी़पी़अ‍ॅन्ड बेरार च्या नोटीफिकेशनमध्ये ४ नोव्हेंबर १९४१ च्या शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकामध्ये गोवारी ही मूळ आदिवासी असल्याचे स्पष्ट उल्लेख आहे़ंसवलतीसाठी दोन पिठ्या गारद झाल्या आहेत़ लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुकीत विदर्भातील गोवारींनी भाजपाला भरभरून मते दिली़आगामी काळात चार राज्यातील गोवारी एकत्र येणार आहे़ त्यामुळे आता आमचा अधिक अंत न पाहता न्याय हक्क मिळवून द्यावा, अशी अपेक्षा दोन्ही सरकारकडून होत आहे़- शालीक नेवारे, अध्यक्ष, गोवारी जमात समन्वय समिती, नागपूर.