शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुलींचे व्हिडीओ व्हायरल प्रकरण; आरोपीच्या घरावर चक्क बुलडोझर, अचलपूर-परतवाड्यातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद, नागरिकांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:38 IST

Crime News: अल्पवयीन मुलींशी जवळीक साधून त्यांचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या प्रकारानंतर नगरपालिकेने मुख्य आरोपी अयान अहमद हा वास्तव्यास असलेल्या घराच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवला. 

परतवाडा (जि. अमरावती) - अल्पवयीन मुलींशी जवळीक साधून त्यांचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या प्रकारानंतर नगरपालिकेने मुख्य आरोपी अयान अहमद हा वास्तव्यास असलेल्या घराच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवला. 

पालिकेला दीड महिन्यापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारीवरून अयान अहमद याच्या घरावर अतिक्रमणासंदर्भात कारवाईची नोटीस बजावत बुधवारी त्याची कार्यवाहीदेखील केली. त्याच्या घराचा जीना काढण्यात आला. घर अनधिकृत असल्यास तेसुद्धा जमीनदस्त केले जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शुभम कुमार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड यांच्या उपस्थितीत आरोपीच्या नातेवाइकाच्या नावावर असलेल्या घराचा लोखंडी जिना अतिक्रमणात येत असल्याने तो बुलडोझरच्या साहाय्याने हटविण्यात आला. उर्वरित बांधकामाबाबत पालिकेने नोटीस बजावली असून, ३० दिवसांत योग्य कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

अचलपूर-परतवाडा बंद, हिंदू सकल समाजाचा एल्गारघटनेच्या निषेधार्थ अचलपूर-परतवाडा ही जुळी शहरे कडकडीत बंद ठेवण्यात आली. आमदार प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू सकल समाजाच्या कार्यकर्त्यांनी एसपी कार्यालय गाठून आरोपींवर फाशीसारखी कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणात आरोपी आणि पीडितांची संख्या वाढू शकेल तसेच यामागे मोठे रॅकेट असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान खासदार बळवंत वानखडे यांनीदेखील विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांची भेट घेतली.

दगडफेक, अफवांचे सावटशहरातील परिस्थिती पाहता ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात दगडफेक झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र पोलिसांनी अशा कोणत्याही घटनेचा इन्कार केला आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

दोषींवर कठोर कारवाई करा; काँग्रेस शिष्टमंडळाची एसपींकडे मागणी काँग्रेसच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे आणि पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन  तपास विशेष चौकशी पथकाद्वारे करावा, अशी मागणी केली आहे. आमदार भाई जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

दीड महिन्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या घराचा जिना अतिक्रमणात असल्याची तक्रार मिळाली होती, त्यानुसार बुधवारी तो हटविण्यात आला. डॉ. धीरज गोहाड, मुख्याधिकारी, नगरपरिषद, अचलपूरआरोपी अयान याने पीडित मुुलींचे लैंगिक शोषण त्याच्या अमरावती येथील मित्राच्या भाड्याच्या घरी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून अन्य दोघे ताब्यात आहेत. अन्य चार संशयितांकडे विचारपूस सुरू आहे.- विशाल आनंद, पोलिस अधीक्षक, अमरावती

४७ सदस्यीय एसआयटीत तीन महिला अधिकारीअमरावती : तब्बल १८ अश्लील व्हिडीओ व ३९ आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या प्रकरणाचा सखोल आणि जलद गतीने तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, यात एकूण ४७ अनुभवी पोलिस अधिकारी आणि अंमलदारांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणातील  संवेदनशीलता पाहता, पारदर्शक तपासासाठी ही विशेष तुकडी तैनात करण्यात आली आहे. सहायक पोलिस अधीक्षक तथा अचलपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी  डॉ. शुभम कुमार यांची एसआयटीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

 ...यांचा समावेशतपास अधिकारी सुरेश मस्के, एलसीबी प्रमुख किरण वानखडे, सायबर पोलिस ठाण्याचे प्रमुख पीआय अशोक लांडे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक अनूप वाकडे, गौतम इंगळे, भरोसा सेलच्या प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक प्रियंका भोयर, सायबरमधील एपीआय संतोष गुर्जर, चांदूर रेल्वे व परतवाडा ठाण्यातील पीएसआय वीणा पंडे व स्नेहल आडे व स्थानिक गुन्हे शाखेतील पीएसआय सागर हटवार यांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Minor Girls' Video Leak: House Demolished, Outrage Grips Achalpur-Paratwada

Web Summary : Following the viral video scandal involving minor girls, authorities demolished the accused's illegal house. Achalpur-Paratwada observed a shutdown amid public anger. Protests erupted, demanding strict action. Police are investigating a potential wider network and have arrested multiple suspects, including four main accused. An SIT has been formed for thorough investigation.
टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी