मुलींचे व्हिडीओ व्हायरल प्रकरण; आरोपीच्या घरावर चक्क बुलडोझर, अचलपूर-परतवाड्यातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद, नागरिकांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:38 IST2026-04-16T10:37:10+5:302026-04-16T10:38:14+5:30

Crime News: अल्पवयीन मुलींशी जवळीक साधून त्यांचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या प्रकारानंतर नगरपालिकेने मुख्य आरोपी अयान अहमद हा वास्तव्यास असलेल्या घराच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवला. 

Girls' video viral case; Bulldozers attack accused's house, commercial establishments in Achalpur-Paratwada closed, anger among citizens | मुलींचे व्हिडीओ व्हायरल प्रकरण; आरोपीच्या घरावर चक्क बुलडोझर, अचलपूर-परतवाड्यातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद, नागरिकांमध्ये संताप

मुलींचे व्हिडीओ व्हायरल प्रकरण; आरोपीच्या घरावर चक्क बुलडोझर, अचलपूर-परतवाड्यातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद, नागरिकांमध्ये संताप

परतवाडा (जि. अमरावती) - अल्पवयीन मुलींशी जवळीक साधून त्यांचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या प्रकारानंतर नगरपालिकेने मुख्य आरोपी अयान अहमद हा वास्तव्यास असलेल्या घराच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवला. 

पालिकेला दीड महिन्यापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारीवरून अयान अहमद याच्या घरावर अतिक्रमणासंदर्भात कारवाईची नोटीस बजावत बुधवारी त्याची कार्यवाहीदेखील केली. त्याच्या घराचा जीना काढण्यात आला. घर अनधिकृत असल्यास तेसुद्धा जमीनदस्त केले जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शुभम कुमार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड यांच्या उपस्थितीत आरोपीच्या नातेवाइकाच्या नावावर असलेल्या घराचा लोखंडी जिना अतिक्रमणात येत असल्याने तो बुलडोझरच्या साहाय्याने हटविण्यात आला. उर्वरित बांधकामाबाबत पालिकेने नोटीस बजावली असून, ३० दिवसांत योग्य कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

अचलपूर-परतवाडा बंद, हिंदू सकल समाजाचा एल्गार
घटनेच्या निषेधार्थ अचलपूर-परतवाडा ही जुळी शहरे कडकडीत बंद ठेवण्यात आली. आमदार प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू सकल समाजाच्या कार्यकर्त्यांनी एसपी कार्यालय गाठून आरोपींवर फाशीसारखी कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणात आरोपी आणि पीडितांची संख्या वाढू शकेल तसेच यामागे मोठे रॅकेट असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान खासदार बळवंत वानखडे यांनीदेखील विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांची भेट घेतली.

दगडफेक, अफवांचे सावट
शहरातील परिस्थिती पाहता ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात दगडफेक झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र पोलिसांनी अशा कोणत्याही घटनेचा इन्कार केला आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

दोषींवर कठोर कारवाई करा; काँग्रेस शिष्टमंडळाची एसपींकडे मागणी 
काँग्रेसच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे आणि पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन  तपास विशेष चौकशी पथकाद्वारे करावा, अशी मागणी केली आहे. आमदार भाई जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

दीड महिन्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या घराचा जिना अतिक्रमणात असल्याची तक्रार मिळाली होती, त्यानुसार बुधवारी तो हटविण्यात आला. 
डॉ. धीरज गोहाड, मुख्याधिकारी, नगरपरिषद, अचलपूर
आरोपी अयान याने पीडित मुुलींचे लैंगिक शोषण त्याच्या अमरावती येथील मित्राच्या भाड्याच्या घरी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून अन्य दोघे ताब्यात आहेत. अन्य चार संशयितांकडे विचारपूस सुरू आहे.
- विशाल आनंद, पोलिस अधीक्षक, अमरावती

४७ सदस्यीय एसआयटीत तीन महिला अधिकारी
अमरावती : तब्बल १८ अश्लील व्हिडीओ व ३९ आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या प्रकरणाचा सखोल आणि जलद गतीने तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, यात एकूण ४७ अनुभवी पोलिस अधिकारी आणि अंमलदारांचा समावेश करण्यात आला आहे. 
या प्रकरणातील  संवेदनशीलता पाहता, पारदर्शक तपासासाठी ही विशेष तुकडी तैनात करण्यात आली आहे. सहायक पोलिस अधीक्षक तथा अचलपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी  डॉ. शुभम कुमार यांची एसआयटीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

 ...यांचा समावेश
तपास अधिकारी सुरेश मस्के, एलसीबी प्रमुख किरण वानखडे, सायबर पोलिस ठाण्याचे प्रमुख पीआय अशोक लांडे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक अनूप वाकडे, गौतम इंगळे, भरोसा सेलच्या प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक प्रियंका भोयर, सायबरमधील एपीआय संतोष गुर्जर, चांदूर रेल्वे व परतवाडा ठाण्यातील पीएसआय वीणा पंडे व स्नेहल आडे व स्थानिक गुन्हे शाखेतील पीएसआय सागर हटवार यांचा समावेश आहे.

Web Title : नाबालिग लड़कियों का वीडियो लीक: घर तोड़ा, अचलपुर-परतवाड़ा में आक्रोश

Web Summary : नाबालिग लड़कियों से जुड़े वायरल वीडियो कांड के बाद अधिकारियों ने आरोपी का अवैध घर तोड़ दिया। सार्वजनिक आक्रोश के बीच अचलपुर-परतवाड़ा में बंद का आयोजन किया गया। सख्त कार्रवाई की मांग करते हुए विरोध प्रदर्शन हुए। पुलिस एक संभावित बड़े नेटवर्क की जांच कर रही है और मुख्य आरोपियों सहित कई संदिग्धों को गिरफ्तार किया है। गहन जांच के लिए एसआईटी का गठन किया गया है।

Web Title : Minor Girls' Video Leak: House Demolished, Outrage Grips Achalpur-Paratwada

Web Summary : Following the viral video scandal involving minor girls, authorities demolished the accused's illegal house. Achalpur-Paratwada observed a shutdown amid public anger. Protests erupted, demanding strict action. Police are investigating a potential wider network and have arrested multiple suspects, including four main accused. An SIT has been formed for thorough investigation.