अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:00 AM2019-11-22T06:00:00+5:302019-11-22T06:00:59+5:30

जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीची सत्ता आहे; मात्र राज्यात महाशिवआघाडी झाल्यास जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना ही विद्यमान आघाडी सत्तेत राहू शकते. दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वात विरोधकांनी मिळून जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, त्यांनाही घटक पक्षांच्या टेकू घेऊनच सत्तेची समीकरणे जुळविता येतात.

Frontline for the presidency | अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी

अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी

Next
ठळक मुद्देनेतेमंडळींना साकडे : उमेदवार निवडीत लागणार कस

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता राखीव झाले आहे. इच्छुक सदस्यांंनी मोर्चेबांधणीला सुरुवात करीत नेतेमंडळींना आशीर्वाद मागितले आहे. यामुळे अध्यक्षपदाचा उमेदवार निवडीसंदर्भात नेतेमंडळींचा राजकीय कस लागणार आहे.
जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीची सत्ता आहे; मात्र राज्यात महाशिवआघाडी झाल्यास जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना ही विद्यमान आघाडी सत्तेत राहू शकते. दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वात विरोधकांनी मिळून जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, त्यांनाही घटक पक्षांच्या टेकू घेऊनच सत्तेची समीकरणे जुळविता येतात.
जिल्हा परिषदेचे पुढील अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता राखीव झाले आहे. या प्रवर्गाच्या सदस्यांची संख्या १६ आहे. यामध्ये प्रत्येकी आठ महिला व पुरुष सदस्यांचा समावेश आहे. त्यापैकी अनेक जण अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याने त्यांनी आपआपल्या राजकीय गॉडफादरच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. आशीर्वाद द्या, अशी विनंती होत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक डिसेंबर-जानेवारीत होईल. तोपर्यंत इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू राहणार आहे. त्यामुळे नेतेमंडळींची डोकेदुखी वाढली आहे. अध्यक्षपदाचा उमेदवार निवडताना नेत्यांचाही राजकीय कस लागणार आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली असली तरी प्रत्यक्षात निवड प्रक्रियेचा कार्यक्रम अद्याप तरी घोषित झालेला नाही. आरक्षण सोडतीनंतर मात्र नव्या अध्यक्षपदासाठीचे राजकीय समीकरण मांडले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात निवड प्रक्रियेचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतरच राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

नामाप्र सदस्य, त्यांचा पक्ष
नागरिकांच्या मागास प्रवर्गातून जिल्हा परिषदेत निवडून गेलेल्या सदस्यांमध्ये अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख, अभिजित बोके, प्रकाश साबळे, जयंत देशमुख, सुरेश निमकर, पूजा येवले, प्रियंका दगडकर, पूजा आमले, अलका देशमुख, वंदना करूले (काँग्रेस), पार्वती काठोळे, विजय काळमेघ (भाजप), राजेंद्र बहुरूपी (राष्ट्रवादी), सुनील डिके (अपक्ष), गौरी देशमुख (लढा), मयूरी कावरे (युवा स्वाभिमान) हे सदस्य आहेत. यामध्ये काँग्रेसकडे प्रत्येकी पाच पुरुष व महिला सदस्य आहेत. भाजपकडे प्रत्येकी एक पुरुष व महिला सदस्य आहे. याशिवाय दोन अपक्ष व एक युवा स्वाभिमानचा सदस्य आहे.

Web Title: Frontline for the presidency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.